Nana Patole sarkarnama
विदर्भ

Nana Patole : राहुल गांधी यांना अडकवण्याचे भाजपचे प्रयत्न; नाना पटोलेंनी भाजपवर डागली तोफ..!

Nana Patole on BJP : राहुल गांधी यांच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी आज दिला.

Rajesh Charpe

नागपूर : राहुल गांधींनी जी भूमिका मांडली त्यामुळे भाजप घाबरली आहे. ते सर्वसामान्य जनतेचा आवाज देशभर पोहचवत असल्याने त्यांना अडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यांचे तोंड बंद करण्यासाठी खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी आज दिला.

राहुल गांधी यांनी नागपूरात येऊन जातिनिहाय जनगणना आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करून थेट भाजपला आव्हान दिले. त्यावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच धुरळा उडला आहे. राहुल गांधी यांना नक्षल समर्थक ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप घाबरली आहे. त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना महाराष्ट्रात प्रचार करता येणार नाही असे प्रयत्न केले जात आहे. मात्र राहुल गांधी घाबरणारे नेते नाहीत. त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर देश पेटून उठेल असे पटोले म्हणाले.

भाजपने (BJP) 15 लाखांचा जुमला दिला आहे. निवडणुकीत दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचेही आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. लोकसभेत पराभव झाल्याने भाजपला लाडक्या बहिणी आठवल्या. आता आमच्या विरोधात लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही तर त्यात आणखी रक्कम वाढवून देणार आहोत.

भाजपकडे जाहिराती देण्यासाठी भ्रष्टाचाराचा कमावलेल्या पैसा आहे. महाराष्ट्रात 67 हजार महिला गायब झाल्या, त्यांच्यावर अत्याचार झाले. असे असतानाही कारवाई होत नसल्याने कोर्टाला सुमोटो याचिका दाखल करावी लागली. ही सरकारची नामुष्की आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना संविधानिक व्यवस्थेची कल्पना नाही. ते राज्यकर्ते असल्यासारखे तोऱ्यात वागतात आणि बोलतात. मनसेचे भोंगे विधानसभेच्या निवडणुकीत जनताच बंद करणार आहे. अशा लोकांबद्दल मी प्रतिक्रिया देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT