Sharad Pawar : राष्ट्रवादीची भूमिकासुद्धा जातनिहाय जनगणनेची; शरद पवारांनी केले स्पष्ट

Sharad Pawar who is on Nagpur tour supports Rahul Gandhi stance on caste based census : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेवर शरद पवार यांनी जाहीर केली मोठी भूमिका.
Sharad Pawar 1
Sharad Pawar 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा हे दोन विषय जोडून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवली आहे. महाविकास आघाडीचा प्रचार प्रामुख्याने या दोन मुद्यांवरच प्रामुख्याने होणार असल्याचे दिसते.

नागपूरला आले असता शरद पवार यांनी सुद्धा आम्ही हीच मागणी तीन वर्षांपासून करीत असल्याचे सांगितले. जातनिहाय जनगणनेनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने जातनिहाय जनगणेची मागणी करीत आहे. बुधवारी नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनात त्यांनी पुन्हा याचा पुनरुच्चार केला. जातनिहाय जनगणना केली जाईल आणि आरक्षणाची 50 टक्क्यांची भिंत तोडून टाकण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शरद पवार नागपूर आले असताना, त्यांना याबाबत विचारणा केल्यावर ते म्हणाले, आम्हीसुद्धा वर्षांपासून हीच मागणी करीत आहोत. ही माझ्या पक्षाची भूमिका आहे. जातगणनेनंतर देशाचे चित्र स्पष्ट होईल. आरक्षणाची मर्यादासुद्धा नव्याने ठरवता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar 1
Vijay Wadettiwar on Bawankule : बावनकुळेंनी राहुल गांधींना नक्षल समर्थक म्हटल्याने वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार विदर्भात दाखल झाले आहेत. दोन दिवस त्यांचा नागपूरमध्ये मुक्काम आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराची सुरवात झाली. नागपूरला तीन आणि एक सभा ते हिंगणघाटला घेणार आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवे आहे. परिवर्तन पाहिजे आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करावे लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar 1
Nana Patole: संविधानाच्या पुस्तकाचा रंग कोणता असावा? शहरी नक्षलवादावरून पटोलेंनी फडणवीसांना फटकारलं

पवारांची खोत यांना माफी नाही?

भाजपचे सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्या शरीराचा उल्लेख करून टीका केली होती. नंतर त्यांनी माफी मागितली. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला, असे सांगून सारवासावर केली. मात्र शरद पवार यांनी गंमतीने बोलले नाही, हसून बोलत होते, याकडे लक्ष वेधून त्यांना माफ केले नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com