Nana Patole and Devendra Fadanvis
Nana Patole and Devendra Fadanvis Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका, फार लवकर नाही होणार..! नानांचा फडणवीसांना टोला !

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole's comments on Fadnavis : महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्यूला ठरलेला नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस तेथील परिस्थिती बघून लढेल, काही स्वबळावरही लढेल, ही भूमिका आम्ही आधीच म्हणजे एक वर्षापूर्वीच स्पष्ट केली आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. (The satirical taunt was put on Fadanvis by the Nana Patole)

आज (ता. १६) नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टिका केली. येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. याबाबत पटोले म्हणाले, तब्बल सव्वा वर्ष झालं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, हे कुठल्या लोकशाहीला पोषक आहे? आता ते सांगत आहेत की ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेणार, हे तर फार लवकर होतं आहे, असं नाही वाटत का, असा उपहासात्मक टोला पटोलेंनी लगावला.

संघात असलेली कुरुळकरांची ही चौथी पिढी..

कुरूळकर हे संघाशी संबंधित आहे. संघ ही वैचारिक संस्था आहे. संघाचा एक व्यक्ती आपल्या देशाची माहिती शत्रूराष्ट्र पाकिस्तानला देत असेल, तर यावर संघानेच उत्तर दिलं पाहिजे. कुरुळकर स्वतः सांगतात की ही आमची चौथी पिढी आहे, जी संघासोबत जुळली आहे आणि आता संघवाले म्हणतात की, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. संघाचे लोक सत्य बोलणारे म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी सत्य मांडलं पाहिजे. कुरुळकर जेव्हा हे कृत्य करत होते, तेव्हा संघाला आणि केंद्र सरकारला माहिती नव्हतं का, असा सवाल पटोलेंनी केला.

कर्नाटकचे निकाल काहीही लागो, पण महाराष्ट्रात आम्हीच नंबर वन आहोत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केलं होतं. त्याचा खरपूस समाचार आज पटोलेंनी घेतला. ते म्हणाले, तुम्ही नंबर वन आहात की नाही, हे निवडणुकीत दिसेलच आणि तुम्हाला फारच घाई असेल, तर सरकार बरखास्त करा आणि या समोर, मग कळेल कोण नंबर वन आहे ते.

समीर वानखेडेची काय चौकशी सुरू आहे, चौकशी ईडी करत आहे सीबीआय, ते मला माहिती नाही, असं राज्याच्या गृहमंत्र्याने (Home Minister) म्हणणे म्हणजे बालिशपणा आहे. आपल्या राज्यात बदमाश लोकांवर कारवाई होत आहे, काही चांगल्या लोकांवरही कारवाई होत असेल, तर गृहमंत्र्यांना हे माहिती असलं पाहिजे.

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत पटोले म्हणाले की, अपात्रतेची कारवाई झाली, तेव्हा नार्वेकर (Rahul Narvekar) अध्यक्ष नव्हते, तर नरहरी झिरवळ होते. हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं, तेव्हा न्यायालयाचे जे काही आदेश येतील, त्यानुसार कारवाई करू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आता जो निर्णय दिला, त्यामध्ये अध्यक्षांसाठी एक चाकोरी ठरवून दिली आहे. त्याच चाकोरीमध्ये अध्यक्षांना आता काम करावे लागेल. त्यामुळे ९० दिवसांच्या आत याबाबत निर्णय घ्यावा लागेल. बाकी सर्वोच्च न्यायालय आहे आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ते त्यांचं त्यांचं काम करतील, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT