Mumbai : महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता.जगताप यांच्या प्रवेशावरुन महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे ठाकरे गटानं महाडच्या जागेवर दावा सांगतानाच स्नेहल जगतापांच्या उमेदवारीविषयी स्पष्ट संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाडची जागा आमचीच असून आम्ही ती लढविणारच असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
मागील काही दिवसांत विविध मुद्द्यांवरुन दावे प्रतिदावे, आऱोप प्रत्यारोपांमुळे महाविकास आघाडीत जोरदार खटके उडाल्याचे पाहायला मिळत होतं. तसेच वज्रमूठ सभांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतरही आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. मात्र, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आणि भाजपचा सुपडासाफ झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
तसेच पवारांनी आघाडीच्या प्रमुख नेतेमंडळींची बैठक घेत आगामी निवडणुका, जागा वाटपावर चर्चा केली. यानंतर पुन्हा एकदा आघाडी भक्कम असलेल्या चर्चांचं वारं वाहू लागलं. पण आता महाडच्या जागेवरुन काँग्रेस ठाकरे गटात खटके उडण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाडच्या जागेसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पटोले म्हणाले, काही महाडची जागा आमचीच असून ती आम्हीच लढविणारच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले होते आपण असं करू नका, परंतु त्यांनी ते ऐकलं नाही. आणि त्यांनी जगतापांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षालाच कमजोर करण्याचे काम होत असेल तर ते चुकीचे आहे.
महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)ची बैठक होईल तेव्हा या विषयावर चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल असंही पटोलेंनी स्पष्ट सांगितले आहे. मात्र, आता महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पटोले अकोल्यातील दंगलीवर काय म्हणाले?
अकोला दंगलीवर भाष्य करताना नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर पटोले म्हणाले, अकोला येथील दंगलीनंतर पोलीस घटनास्थळी एक तास उशिरा पोहचले. ते का उशिरा पोहचली. ही दंगल पोलीस प्रशासनामार्फत दंगल घडवाहेत का होती का याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी उत्तर द्यावं.
त्याठिकाणी सरकार, मंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे नेतेमंडळी का पोहचले नाही ? पोलिसांनी त्यांची समजूत का नाही काढली? असा सवाल करत प्रशासकामार्फत सरकारला अशा दंगली घडवायच्या आहेत का असा गंभीर आरोप पटोलेंनी यावेळी केला आहे. हा शाहू, फुले, आंबेडकर विचारधारांचा महाराष्ट्र आहे. सर्वधर्मसमभावाचा महाराष्ट्र आहे. इथे अशाप्रकारे दंगली घडू देणार नसल्याचंही ते म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.