Nana Patole
Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole बघताहेत विरोधकांच्या उमेदवाराची वाट !

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Teacher and Amravati Graduate Constituency Election : नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा पाठिंबा कुणाला किंवा कॉंग्रेस आपला उमेदवार देणार का, या प्रश्‍नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे इतर भाजपही वेट ॲंड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. तिकडे शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे तयारीला लागले आहेत आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्याची त्यांना अपेक्षा आहे. यासंदर्भात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता, आमच्या मुख्य विरोधकांची चाल बघून आम्ही आमचा उमेदवार देऊ, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत वेळ आहे. विरोधकांची रणनीती बघून आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असेही नाना (Nana Patole) म्हणाले. विदर्भातील (Vidarbha) नागपूर (Nagpur) विभागात शिक्षक आमदार तर अमरावती (Amravati) विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. मात्र अद्यापही काँग्रेस वा महाविकास आघाडीने उमेदवार घोषित केला नाही. याकडे पटोले यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, आणखी सहा दिवस आमच्या हातात आहे. विरोधकांचे उमेदवार बघून आमच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.

भाजप चुकीचा इतिहास लोकांसमोर मांडण्याची धडपड करत आहे. कुठल्याही शब्दावर वाद घालून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वराज्य रक्षक की धर्मवीर शब्दावरून सध्या सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. सरकारमधील जे जे नफ्याचे क्षेत्र आहे त्यांना लुटण्याचा काम सुरू भाजपने सुरू केले आहे. वीज वितरण अदानीला यांना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी अदानी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केल्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली, असेही नाना पटोले म्हणाले.

जनतेच्या मुख्य प्रश्‍नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप कारण नसताना काहीही वाद उकरून काढत आहे. इतिहासाबद्दल कुणी काही बोललं की लगेच त्यातील एक शब्द पकडून त्यावरून राजकारण करीत महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्याची व्यवस्थाच भाजपने उभारली आहे. थोर पुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यास गुन्हे दाखल केले जातात, येवढेच काय तर सोशल मिडियावर जरी कुणी काही अशी पोस्ट केली, तरीही गुन्हे दाखल होतात. पण राज्यपालांनी थोर पुरुषांबद्दल एक नाही तर अनेक वेळा अपमानजनक वक्तव्य केले आहेत. मग राज्यपालांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT