nana patole mother mirabai patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole : नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई पटोले यांचे निधन

Nana Patole News : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले (Mirabai Patole) यांचे रविवार (ता.29) पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jagdish Patil

Bhandara News, 29 Dec : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले (Mirabai Patole) यांचे रविवार (ता.29) पहाटे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी ता. साकोली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचेवृध्दापकाळाने निधन झाले त्या 90 वर्षाच्या होत्या. नाना पटोले (Nana Patole) यांना मातृशोक झाल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

तर मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT