Anjali Damania : संतोष देशमुख हत्येप्रकरणी केलेलं 'ते' वक्तव्य अंजली दमानियांना भोवणार? बीड पोलिसांनी धाडली नोटीस

Anjali Damania On Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशा विविध मागण्यांसाठी शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता.
Anjali Damania, Santosh Deshmukh
Anjali Damania, Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 29 Dec : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारमधील काही मंत्रीच या घटनेतील आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.

अशा विविध मागण्यांसाठी शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) देखील सहभागी होणार होत्या मात्र, ऐनवेळी माघार घेत त्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा दमानिया यांनी केला होता.

मात्र, आता त्यांनी केलेला हा दावा त्यांच्याच अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या या वक्तव्याबद्दल बीड (Beed) पोलिसांनी त्यांना एक नोटीस पाठवली आहे. दमानिया यांनी फरार आरोपींच्या मृत्यूचा दावा केला आहे, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांनी ही नोटीस बजावली आहे. तसंच ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेजसह इतर माहिती आणि पुरावे द्या, असंही या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर ही नोटीस मिळाल्यानंतर दमानिया यांनी पोलिसांचे पत्र बघून मला आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Anjali Damania, Santosh Deshmukh
Santosh Desmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे सीआयडीला आदेश; फरार आरोपींची संपत्ती जप्त करा

त्या म्हणाल्या, एसपींनी मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली नसेल. म्हणून त्यांचे काल मला एक पत्र आले. त्यात सगळी माहिती देण्याचे आवाहन केलं आहे. माझ्याकडे आलेली माहिती मी त्या मिनिटालाच एसपींकडे पाठवली होती. त्याचे व्हॉइस मेसेजसह सगळे डिटेल्स त्यांना दिले आहेत. पहिले दोन मेसेज जे डिलीट झाले आहेत त्याचीही माहिती पोलिसांना दिली आहे. तरीही मला नोटीस आली आहे त्यामुळे हे पत्र बघून मला आश्चर्य वाटलं.

Anjali Damania, Santosh Deshmukh
Chandrant Patil : प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्या वादात चंद्रकांत पाटलांची मध्यस्ती, म्हणाले, "दोनवेळा फोन केला..."

मात्र, तरीही पोलिसांना माहिती हवी असेल तर मी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ज्या गावाचा व्हाइस मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तिथे पोलिसांनी ताबडतोब पथक पाठवायला पाहिजे होतं, ते त्यांनी पाठवलं की नाही याचाही खुलासा करायला हवा होता. पण तो केलेला नाही. ही घटना गंभीर असून त्यातील तथ्य पोलिसांकडून बाहेर आले पाहिजे होते. पण तसे होताना दिसत नाही. पण वेळ पडली तर मी तिथे जाणार असंही त्या यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com