Nana Patole and Chandrashekhar Bawankule
Nana Patole and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Nana Patole's Warning: राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा, नानांनी भरला दम !

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole vs Chandrashekhar Bawankule News : राहुल गांधी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. त्यानंतर राहुल गांधींनी आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागावी अन् त्यानंतर महाराष्ट्रात पाऊल ठेवावे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता. (Narendra Modi called the farmers Khalisthani)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले आज भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे आले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल त्यांना छेडले असता, ‘राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागला, तर याद राखा...’, असा दम त्यांनी आमदार बावनकुळेंचे नाव न घेता दिला.

यावेळी नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी हे महाराष्ट्रात येतील, तुमच्यात धम्मक असेल तर राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लावून दाखवा. जशास तसे उत्तर देऊ, असा दम नानांनी दिला. राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल माफी मागावी, असे वक्तव्य आमदार बावनकुळे यांनी केले होते. त्याचा समाचार नाना पटोले यांनी साकोलीत घेतला.

नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खलीस्थानी, आंदोलनजीवी म्हटले होते. त्याबद्दल मोदी यांनी कधीच माफी मागितली नाही. तर माजी राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा आपल्या भूमीतील संताचा अपमान केला. त्याची माफी कधी भाजपवाल्यांनी मागितली नाही. बेरोजगारी वाढविली, महागाई वाढविली. यासाठी देशातील जनतेची माफी कोण मागणार, असा सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला.

जनतेची माफी कोण मागणार यांची उत्तरे आधी भाजपने द्यावी. महाराष्ट्राची ही परंपरा नाही तशी नाही, मात्र जशास तसे उत्तर देऊ. काही नेत्यांनी अशा फालतू गोष्टी करू नये. भाजप जनतेची दिशाभूल करत असल्याच्या आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

‘तो’ विषय राष्ट्रवादीचा..

भाजपसोबत जाणे हा राष्ट्रवादीचा विषय आहे. मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपसोबत जात असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल, असे म्हणत नाना पटोले कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. भंडारा - गोंदिया बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या युतीमुळे अजित पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे राज्याने बघितले.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरूड बाजार समितीत भाजप (BJP) आणि काँग्रेसची (Congress) युती झालेली आहे. यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, भाजपसोबत जाणे हा राष्ट्रवादीचा विषय आहे. मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपसोबत जात असतील तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT