Maharashtra Politics: राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळा अपमान केला. आताही त्यांची भूमिका बदलली नाही. त्यांनी माफी मागितलेली नाही. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा दम भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
नागपूर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील पुतळ्याला अभिवादन केल्यावर माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची वारंवार अवहेलना केली. त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला.
जाणीवपूर्वक वारंवार नाव घेऊन अपमान करीत राहिले. त्यांनी सावरकरांविषयी बोलू नये, त्यांची उंची नाही असे समजावून सांगितले. मात्र कोणताही फरक पडला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व वक्तव्याची माफी राहुल गांधी यांनी मागावी, असे मत मा. बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नाना पटोले यांनी केलेल्या हिंदूराष्ट्र या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, भारतात राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा व कोणत्याही समाजाचा असो तो भारतीय आहे. भारत हाच हिंदुस्थान असल्याने त्यांचे विचार हिंदुत्ववादी आहेत. हिंदुस्थान हाच भारत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभेसाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आज नागपुरात (Nagpur) दाखल होणार आहेत. याबद्दल विचारले असता संजय राऊतांचा दररोजचा सकाळचा कार्यक्रम काही केल्या बंद होत नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला काय उत्तर देत बसणार? त्यांच्या वक्तव्यावर बोलण्यासाठी भाजपने सात प्रवक्त्यांनी नियुक्ती केली आहे. आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतील, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.