Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : शिवधनुष्य यात्रा आणि राज ठाकरेंना भेटल्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांना भेटावे !

Rahul Gandhi : राहुल गांधींची लाइन कॉंग्रेसच्या विचारांची आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur Congress News : देश वाचवायचा असेल, पुढे न्यायचा असेल, तर सर्वधर्म समभावाचा विचार घेऊनच चालावे लागेल. याबाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे. असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

कॉंग्रेसने सावरकरांचा विरोध केल्यामुळे शिवसेनेची (उद्धव ठाकरे) गळचेपी होत आहे, याबाबत विचारले असता. महाविकास आघाडीत आम्ही आहोत. पण पक्ष म्हणून त्यांचा विचार वेगळा आहे आणि आमचा विचार वेगळा आहे. याबाबत पक्ष स्तरावर काय ते ठरेल. राहुल गांधींची लाइन कॉंग्रेसच्या विचारांची आहे. कॉंग्रेसने या देशाला वाढवले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश पुढे नेला आहे. पण डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक धोरण बदलवून जीएसटीसारखा कायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने आणला आणि गरिबांना लुटून मूठभर लोकांना वाटणे सुरू आहे. त्याविरोधात आमची लढाई आहे. गरीब लुटला जात असताना आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, असे पटोले म्हणाले.

आज तुमच्या आमच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्यूटर जे आहेत, ही व्यवस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी उभी केली आहे. भारतात या गोष्टींची सुरुवात त्यांनी केली. बोफोर्ससारखी तोफ आणून या देशाला सुरक्षित करण्याचे काम केले. त्याच राजीव गांधींना त्यावेळी हे लोक चोर म्हणत होते. मग त्यांच्यावरही तर कारवाई झालेली नाही. मग आज राहुल गांधींनी चोराला चोर म्हटले तर कारवाई का, असा प्रश्‍न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवधनुष्य यात्रा सुरू करत आहेत. याबद्दल विचारले असता, अशा यात्रा काढण्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचा विचार करावा. रोज शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अशा वेळी त्यांनी यात्रा नाही, तर शेतकऱ्यांना जाऊन भेटले पाहिजे. छत्रपती संभाजी राजे नवीन राजकीय पक्ष काढणार आहेत, त्याबद्दल विचारले असता, देशात पक्ष काढणारे अनेक लोक आहेत. अनेक पक्ष निघत आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, तो संभाजी राजेंचा अधिकार आहे, असे पटोले म्हणाले.

नेहरूजी या देशाला आधुनिक युगाकडे घेऊन गेले. देशात डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स तयार करण्याची यंत्रणा निर्माण केली, त्या नेहरूंनाही या लोकांनी बरेवाईट बोलले आहे. त्यांच्यावरही कारवाई नाही झाली. मग आत्ताच ही कारवाई का, असा सवाल पटोलेंनी (Nana Patole) केला. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरू केलेल्या या लढाईत जो कुणी आमच्या सोबत येईल, त्याचे स्वागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT