Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : स्वबळाची भाषा नाना पटोलेंना अडचणीची ठरतेय का?

Maharashtra : प्रदेशाध्यक्ष पदावरून विविध चर्चा राज्यभर सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

There is talk that Nana's opponents within the party have become active : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून विविध चर्चा राज्यभर सुरू आहेत. काहींच्या मते पक्षांतर्गत विरोधकांमुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर व्हावं लागेल, तर काहींच्या मते पटोलेंकडून सातत्याने होणारी स्वबळाची भाषा त्यांना अडचणीची ठरणार. (Various discussions on the post of state president are going on across the state)

सातत्याने स्वबळाची भाषा करत असल्यामुळे नानांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रीय झाल्याची चर्चा आहे. हे सर्व तर्क वितर्क लावले जात असले तरी ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष पदावरून पटोलेंना हटवले, तर तर प्रमुख विरोधी पक्षाला आयतेच कोलीत मिळाल्यासारखे होणार आहे. कधीकाळी लाखांदूर क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे आमदार राहून नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यात राजकीय पक्षांना समांतर अशी ओबीसी छावा संग्राम संघटना निर्माण केली.

छावा संग्राम संघटनेच्या बळावर नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया-लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून दुसऱ्या पसंतीची मते प्राप्त केली होती. मात्र नंतरच्या काळात नाना पटोलेंनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळविली आणि त्यानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यात राजकीय पक्षांना समांतर असलेली ओबीसी संग्राम छावा संग्राम संघटना गोठविण्यासाठी दबाव तंत्राचा वापर झाला.

छावा संग्राम संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू आहे. या संघटनेचा फारसा राजकीय वापर पटोलेंनी केला नाही. तरीही ओबीसी युवा मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत जुळून आहे. अशातच राज्यात नव्याने भाजप पक्षांतर्गत मागील काही काळात ओबीसी नेत्यांचे झालेले खच्चीकरण सर्वच ओबीसी नेत्यांना खटकलेले आहे. त्यामुळेच की काय ओबीसी नेत्यांच्या पुनर्बांधणीसाठी भाजपकडून पक्ष सोडून गेलेल्या ओबीसी नेत्यांची मनधरणी करून त्यांच्या घर वापसीचे प्रयत्न सुरू झाल्याचे जाणवत आहे.

सध्या भाजपअंतर्गत ओबीसी मतांवर अधिराज्य मिळविण्यासाठी जरी काहीही प्रयत्न सुरू असले, तरी मागील काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण व भाजपची भूमिका या मुद्द्यांवरून जनतेत खदखद असल्याचे जाणवत आहे. दुसरीकडे नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत काहीजण नाराज दिसत असले तरी शेतकरी व ओबीसी नेता म्हणून देश पातळीवर नाना पटोले यांची बाजू उजवी दिसते.

जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकार (State Government) विरोधी आंदोलनामध्ये ओबीसींचा (OBC) सहभाग. त्यातच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ओबीसी मतदारांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, नाना पटोले (Nana Patole) प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकच उजवे ठरले आहेत.

म्हणूनच की काय तर नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात येणार असल्याच्या बोंबा पक्षातील विरोधकांकडून ठोकल्या जात आहेत. ओबीसी जनतेने विचार करून नाना पटोलेंची बाजू भक्कम केली तर येणाऱ्या निवडणूक निकालात कॉंग्रेसच्या बाजूने असतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT