Nana Patole  Sarkarnama
विदर्भ

Nana Patole News : वज्रमूठ सभेला येणार की नाही, आज नाना पटोले स्पष्टच बोलले !

Nagpur News: नियोजनाच्या एकाही बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बघायला मिळाले नाही.

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. एक लाखाच्या वर लोक येतील, असा अंदाज बांधला जात आहे. पण नागपुरात झालेल्या नियोजनाच्या एकाही बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बघायला मिळाले नाही. त्यामुळे ते सभेला येणार की नाही, याबबतीत विविध चर्चांना उधाण आले होते. (Differences among Congress leaders are well known)

कॉंग्रेस नेत्यांमधील मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यातही वज्रमूठ सभेचे नियोजन आणि आयोजनाची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्याकडे आहे. पहिल्या दिवसापासून ते प्रत्येक गोष्ट बारकाईने बघत आहेत. पटोले आणि केदार यांचे फारसे पटत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळेच की काय कॉंग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीमध्ये सुनील केदार यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

एकही निवडणूक न लढविलेले कॉंग्रेसचे काही नेते समितीमध्ये आहेत, पण केदारांना त्यात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकांना धक्काही बसला. आता वज्रमूठ सभेचे आयोजक सुनील केदार असल्यामुळे नाना पटोले येणार नाहीत, अशा चर्चा सुरू होत्या. आज यासंदर्भात नाना पटोले यांना विचारले असता, सभेला येणार असल्याचे ते म्हणाले. अशा सर्व चर्चा भाजपकडून पसरवल्या जात असल्याचा आरोप पटोलेंनी केला.

सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील, दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभा होऊ नये यासाठी प्रयत्न भाजपने आटोकाट प्रयत्न केले आहेत. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे, सभेची सगळी तयारी झालेली आहे, संजय राऊत येणार आहेत. सभेची जय्यत तयारी झालेली असल्याचे पटोले यांनी नागपुरात माध्यमांना सांगितले.

राहुल गांधी मातोश्रीवर येणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. याबाबतीत विचारले असता, राहुल गांधीचा भेट घेण्याचा अजून कार्यक्रम आला नाही. भाजप विरोधातील सगळे लोक एकत्र येत आहे. नितेश कुमार यांना संयोजक करण्यात आलेले आहे. भाजप विरोधात मोट बांधण्याचे काम सुरू आहे. भाजप विरोधी राजकीय दलांना एकत्र आणण्याचे काम काँग्रेस करत आहे. देश वाचवण्याचे काम काँग्रेस करत आहे, असे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) हिंदुत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. त्यावर कुणी वाद वाढवण्याचे प्रयत्न करू नये. जाणीवपूर्वक जनतेचे लक्ष भरकटवण्याचे काम चालू आहे. महागाई वाढली. यावर सत्ता पक्षाच्या लोकांनी लक्ष घातलं पाहिजे. मात्र याला तोडणे त्याला तोडण्याचे काम चालू आहे. जनतेने तुम्हाला लुटण्यासाठी किंवा तोडा तोडीसाठी नाही. तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बसवलेले आहे, त्यावर चर्चा केली पाहिजे, असे पटोले म्हणाले.

आपण हिंदुस्थानातच राहतो हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने (BJP) सांगावा. भाजप ज्यांना मानते, त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती, ते त्यांनी स्पष्ट करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी सर्वधर्म समभाव मांडला आहे. भाजपने हिंदुत्व सांगून लोकांपुढे यावं. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे, ते त्यांना थांबवावे, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT