Nana Patole on Mahavikas Aghadi Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटणार?

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितली महत्त्वाची तारीख

अभिजीत घोरमारे

Lok Sabha Election 2024 : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. मात्र अद्याप लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भातील तिढा सुटलेला नाही आहे. त्यामुळे नेहमीच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यातही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ अशी दिली जात होती. मात्र आता जागेवर वाटपांच्या तिढा सुटण्याची तारीख स्वत: कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ‘फिक्स’ केली आहे. येत्या 27, 28 व 29 फेब्रुवारीला होणाऱ्या संयुक्त बैठकीत हा तिढा पूर्णपणे सुटणार आहे. जागा वाटपाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी जे ठरेल, ते आघाडी धर्मानुसार पाळले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

कचारगड येथे सुरू असलेल्या कोयापुनेम महोत्सवात सहभागी होण्यासाठी पटोले गोंदिया जिल्ह्यात आले होते. त्यावेही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले यांनी भाजपवर निशाणाही साधला. भाजप सरकार सर्वसामान्य नागरिक, मध्यवर्गीय कर्मचारी तसेच देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी विरोधी आहे. हक्कासाठी लढा उभारत असतानाही त्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. उलट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खालीस्तानी आंदोलनकर्ता म्हणून संबोधले जात आहे. यावरून ही भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात ‘पंजा’ हे चिन्ह उमेदवाराच्या माध्यमातून दिसून आले नव्हते. मात्र आगामी निवडणुकीत निश्चितपणे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह मतदारांना दिसून येणार आहे. नाना पटोले यांनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर काँग्रेस निवडणूक लढविणार, असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यावरून नानांनी या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर दावा प्रस्तापित केला आहे. शेवटी मंगळवारी होणारी महाविकास आघाडीची बैठक महत्वाची ठरणार आहे.

महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष लढविणार, हे बैठकीनंतरच निश्चित होईल. पटोले यांच्या सोबत आमगाव-देवरीचे आमदार सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, सोनु नेताम, नामदेव किरसान, संदीप भाटिया, सुनंदा बहेकार, ओमप्रकाश रामटेके, मीना राऊत, उषा शहारे, राधिका धरमगुडे, रंजित कासम, प्रल्हाद सलामे, भारती सलामे, अनुसया सलामे, राजू चांदेवार आदींही काँग्रेसने या दोन्ही मतदासंघात निवडणूक लढावी अशी आग्रही मागणी केली. काँग्रेस या दोन्ही मतदारसंघात विजयी होईल, असा विश्वासही सर्वांनी व्यक्त केला.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT