Nana Patole : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज आहे. मात्र, अद्याप लोकसभेच्या जागावाटपासंदर्भातील तिढा सुटला नाही. त्यासाठी 'तारीख पे तारीख' महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यातही नाना पटोले यांच्याकडून दिली जात होती. मात्र, आता जागावाटपाचा तिढा सुटण्याची तारीख खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फिक्स केली आहे.
27, 28, 29 फेब्रुवारी होणाऱ्या संयुक्त बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटणार आहे. जागावाटपाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी जे ठरेल, ते आघाडी धर्मानुसार पाळले जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. कचारगड येथे सुरू असलेल्या कोयापुनेम महोत्सवात सहभागी होण्यासाठी पटोले काल (ता. 23) गोंदिया जिल्ह्यात आले होते. तेव्हा रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजप सरकार सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय कर्मचारी तसेच देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकरीविरोधी आहे. हक्कासाठी लढा उभारत असतानाही त्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. उलट आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, आंदोलनजीवी म्हणून संबोधले जाते. त्यामुळे भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत पंजा हे चिन्ह उमेदवाराच्या माध्यमातून दिसून आले नव्हते. मात्र, आगामी निवडणुकीत निश्चितपणे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह दिसून येणार आहे, असे सांगत त्यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच केले. अर्थात नानांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.
मंगळवारपासून होणारी महाविकास आघाडीची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. असे असले तरी महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष लढविणार, हे बैठकीनंतरच निश्चित होईलच. दरम्यान, त्यांच्यासोबत आमगाव-देवरीचे आमदार सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, सोनू नेताम, नामदेवराव किरसान, संदीप भाटीया, सुनंदाताई बहेकार, ओमप्रकाश रामटेके, मीनाताई राऊत, उषा शहारे, राधिका धरमगुडे, रंजित कासम, प्रल्हाद सलामे, भारती सलामे, अनुसया सलामे, राजू चांदेवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.