Nana Patole News : ‘या’ कारणांनी होतोय नाना पटोलेंना काँग्रेसमध्ये विरोध !

Congress : काँग्रेस मजबूत करण्याचे काम नाना पटोले यांनी मोठ्या शिताफीने केलेले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole News : कोणताही राजकीय पक्ष म्हटला, की त्या पक्षात अंतर्गत गटबाजी, विरोध, नाराजी असले प्रकार होत असतात. कधी कधी पक्षाच्या मुख्य नेत्यालाही विरोध होतो. असाच काहीसा प्रकार काँग्रेस पक्षात सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्याच पक्षात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजीनामा सत्रामुळे हा सर्व प्रकार आता उघडही होऊ लागला आहे.

नाना पटोले यांना त्यांच्याच पक्षामध्ये इतका विरोध का, याची कारणे आता ‘सरकारनामा’च्या हाती लागलेली आहेत. नाना पटोले यांनी फेब्रुवारी 2021 ला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून आतापर्यंत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून काँग्रेस कार्यकर्ते जोडण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. नानांनी प्रत्येक जिल्ह्यात मृतप्राय झालेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस औषधालाही उरली असताना प्रत्यक्ष जाऊन तेथील काँग्रेस कमकुवत का, याची कारणे शोधून त्यावर त्वरित उपाययोजना केल्या. त्या जिल्ह्यांत काँग्रेस मजबूत करण्याचे काम नाना पटोले यांनी मोठ्या शिताफीने केलेले आहे. याशिवाय विरोधकांना त्यांनी आपल्या राजकीय खेळीने मात देण्याचे कामसुद्धा केले आहे. या सर्व घडामोडींमध्ये साहजिकच नाना पटोले यांची लोकप्रियता वाढली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole
Nana Patole News : पुन्हा एकदा सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूक !

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांना त्यांची अचानक वाढत चाललेली लोकप्रियता पचनी पडलेली दिसत नाही. दुसरीकडे नाना पटोले यांचा थेट संपर्क काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार राहुल गांधी यांच्याशी आहे. त्यांच्या या थेट संपर्काने महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतेही दुखावले गेले आहे. साहजिकच कमी वेळात नाना पटोले यांनी त्यांच्या काँग्रेसच्या राजकारणात उमटवलेल्या ठशाने इतर नेत्यांना अवघड झाले आहे.

का आहेत राहुल गांधींचे विश्वासू ?

काँग्रेस पक्षाच्या सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून भाजपला ओळखले जात आहे. भाजप सध्या सत्तेत आहे. त्यामुळे भाजपला पर्यायाने नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात कडवा विरोध देणारा नेता म्हणून फक्त नाना पटोले यांच्याकडे पाहिले जात आहे. भाजपने भ्रष्टाचाराचे कारण देत काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर चौकशा लावलेल्या आहेत. अनेक नेते कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. असे सर्व घडत असताना नानांवर मात्र अद्याप कोणताही आरोप झाला नाही. कोणत्याही वादग्रस्त घोटाळ्यात अथवा कोणत्याही चौकशीकरिता नाना सापडले नाहीत.

नानांवर आजवर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाची साधी नोटीससुद्धा आली नाही. या सर्व घडामोडी पाहता महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून नाना पटोलेंना सध्या ओळखले जाते आणि म्हणून नाना पटोले यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांनी दिली आहे. नानांची क्लीन चिट प्रतिमा इतरांच्या डोळ्यांत खुपणारी ठरत आहे. त्यामुळे नानांचा काँग्रेसमध्ये विरोध होत असल्याचे सांगण्यात येते.

Edited By : Atul Mehere

R

Nana Patole
Jayant Patil Vs Nana Patole : काका-पुतण्यावरून जयंत पाटील अन् नाना पटोलेंच्यात टोलेबाजी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com