Nana Patole, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Nana's Question To Government: किमान ७५ प्रश्‍न तरी निकाली काढावेत; पण आलिशान हॉटेलमधून शक्य होईल का?

Atul Mehere

Nagpur Political News : मराठवाड्याच्या हितासंदर्भात राज्यातील सरकारला काहीही देणे-घेणे नाही. आम्ही यासंदर्भात विधानसभेत आवाज बुलंद केल्यावर सरकार मंत्रिमंडळाची बैठक घेत आहे. परंतु आलिशान हॉटेलमधील वास्तव्यावर लाखो रुपये खर्च करून मराठवाड्यातील प्रश्न खरोखर सुटतील का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला. (Congress surrounded the government in the assembly)

काँग्रेसने विधानसभेत सरकारला घेरले. त्यानंतर कुठे सरकारला मराठवाड्याच्या विषयांबाबत जाग आली. मुक्तिसंग्रामाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना मराठवाड्याचे किमान ७५ प्रश्न तरी निकाली काढावेत, अशी मागणी आमदार पटोले यांनी केली. पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका आदी शासकीय विश्रामगृहांमध्ये व्हायच्या. परंतु एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचे सरकार आलिशान हॉटेलवर खर्च करण्यात धन्यता मानत आहे.

जनतेच्या पैशांची ही उधळपट्टीच आहे, अशी टीका पटोले (Nana Patole) यांनी केली. मराठवाड्याच्या (Marathwada) मुद्द्यावर सरकारने ‘टाइमबाउंड’ कार्यक्रम सांगणे गरजेचे आहे. केवळ हवेत गोळीबारासारख्या घोषणा करून काहीही होणार नाही. या प्रदेशातील प्रश्न किती दिवसांत सोडविणार, हे ठामपणे सरकारने सांगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

ओबीसी (OBC) आरक्षणाबाबत बोलताना आमदार पटोले म्हणाले की, यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्याचा सरकारला अधिकारच नाही. ओबीसींचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. २०१७ पासून त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. केंद्र सरकारनेही यासाठी निधी दिलेला नाही. आता सरकार ओबीसींच्या आरक्षणावर डल्ला मारू पाहात आहे.

विविध समाजांमध्ये फूट पाडण्याचे काम करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडले आहे. ऊस उत्पादक शेतकरी पिचला आहे. इतर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्थाही दयनीय आहे. मात्र, सरकारला त्याचं सोयरसूतक नाही, असा घणाघातही आमदार पटोले यांनी केला.

राज्यातील पदांवर कंत्राटी पद्धतीने भर्ती करण्याचा निर्णय सपशेल चुकीचा आहे. आपल्या मर्जीतील लाेकांना हे कंत्राट द्यायचे आणि तरुणाईचे खिसे कापायचे, असा सरकारचा घाट असल्याचा आरोप करीत आमदार पटोले यांनी यासंदर्भातील शासन आदेश रद्द करण्याची मागणी केली. कंत्राटी नोकरभरतीचा आदेश रद्द न झाल्यास काँग्रेस राज्यभरात आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावे ळी दिला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT