Bhandara : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते, यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.
"मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत न जाता राजस्थानला का गेले ?" असा सवाल पटोलेंनी केला आहे. "शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर फडणवीस मराठा आरक्षणाची जबाबदारी झटकतील," अशी शक्यता पटोले यांनी व्यक्त केली आहे.
नाना पटोले म्हणाले, "शिंदेचे आमदार जर अपात्र ठरले तर फडणवीस मुख्यमंत्री होतील. त्यावेळी ते म्हणतील की एकनाथ शिंदेनी आश्वासन दिले होत, असे सांगून फडणवीस मोकळे होतील,"
"फडणवीसांनी 2014 मध्ये मराठा, धनगर समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मांडली. मग जरांगे पाटलांचा उपोषण सोडवायला ते मुख्यमंत्र्यांसोबत न जाता राजस्थानला कशासाठी गेले. फक्त मुद्दा बाजूला ठेवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक केले. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रेतेची नोटीस शिवसेनेच्या आमदारांना बजावली आहे. त्यामुळे सेनेच्या आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन जरांगे पाटलांना दिले आहे," असा आरोप पटोलेंनी केला आहे.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.