Navneet Rana sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : अखेर नवनीत राणा यांनी घेतला निर्णय....

Sachin Deshpande

Amravati Loksabha Election 2024 : केंद्रात आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या जवळचे असाच परिचय राणा दाम्पत्य चा आहे. त्यामुळे अखेर युवा स्वाभिमान बाजुला ठेवत राणा परिवाराने भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसुळ यांना तिकिट मिळते की, नाही हे पाहण्यासारखे ठरेल. नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना की, भाजप सोबत जातात या विषयी अनेक तर्कवितर्क होते. अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांना मात्र नवनीत राणा यांना तिकिट दिल्यास धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. इतकेच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून रवी राणा यांच्या विरोधात राजकीय संघर्ष करणाऱ्या बडनेरा विधानसभेसाठी इच्छूक भाजप नेत्यांना या पुढे गप्प बसावे लागणार आहे.

युवा स्वाभिमान च्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून भाजप चा स्थानिक विरोध आहे. त्यामुळे भाजप स्थानिक नेते हे राणा दाम्पत्य भाजप मध्ये आल्यावर त्यांना स्विकारतात की, त्यांना विरोध करतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. अमरावती लोकसभा मतदार संघाबरोबर बडनेरा विधानसभा मतदार संघावर भाजप ला पाणी फेरावे लागणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे युवा स्वाभिमान विरोधात संघर्ष करणाऱ्या भाजप नेत्यांच्या संघर्षावर यामुळे पाणी फेरले जाणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नेतृत्वाच्या निर्णयापुढे भाजप नेते माना झुकवितात काय, असा प्रश्न या निमित्त विचारला जात आहे. अनेक वर्षापासून भाजपसाठी कार्य करणाऱ्या भाजप नेत्यांना यामुळे डावलले जाण्याची भिती निर्माण झाली आहे. राणा परिवार आणि भाजप नेत्यांमध्ये या पुर्वी शाब्दीक वार सुरु होते आता थेट नवनीत राणा या भाजप मध्ये जाणार असल्याने भाजप नेत्यांना मात्र मुग गिळून गप्प बसावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी घेतल्याचे जाहिर केले आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या मेळाव्यात या विषयीची निर्णय घेण्यात आला. युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या खासदार नवनीत राणा यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्धार व्यक्त करत एनडीए त्यांच्या विषयी जो निर्णय घेईल, तो राणा दाम्पत्याला मान्य असेल असाच ठराव युवा स्वाभिमान च्या मेळाव्यात घेण्यात आला.

नवनीत राणा या आतापर्यंत युवा स्वाभिमान पार्टीच्या लोकसभेत खासदार होत्या. मात्र, देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राहणे ही काळाची गरज आहे. एनडीएने खासदार राणांची दखल घेतली असून, आता त्या राष्ट्रीय स्तरावर देशहितासाठी नेतृत्व करणार आहेत. जो काही केंद्र स्तरावर एनडीएकडून निर्णय येईल, तो मान्य असेल असे आमदार रवि राणा यांनी स्पष्ट केले. भाजपसोबत राहू, अशी भूमिका आमदार रवी राणा यांनी यावेळी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT