Navneet Rana News Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana News: 'मोदींची हवा..., या फुग्यात कोणी राहू नका'; राणांची थेट मोदींवरच टीका

Mangesh Mahale

Amravati News: अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. एका सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत त्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीकास्त्र डागले होते, आता थेट मोदींवर टीका केली आहे.

"ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतीप्रमाणेच लढायची असून, बारा वाजेपर्यंत सर्व मतदारांना आपल्याला बूथवर आणून मतदान करण्याचे सांगायचे आहे. मोदींची हवा आहे.., या फुग्यात कोणी राहू नका," असे विधान नवनीत राणा यांनी केले आहे.

गेल्या निवडणुकीत मोदींची हवा असतानाही आपण कसे निवडून आलो, हे राणांनी सांगितले. "गेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून येऊन आपला झेंडा गाडला होता," असे खळबळजनक विधान केल्याने नवनीत राणा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती रवी राणा हेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, नवनीत राणा त्यांना घेऊन येतील, असे बावनकळे म्हणाले होते. बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार नवनीत राणा यांनी घेतला होता. "बाहेरच्या व्यक्तींनी नवरा-बायकोमध्ये न बोललेलं बरं," अशा शब्दांत नवनीत राणांनी बावनकुळेंना फटकारले होते, आता थेट नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांनी विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT