Hemant Godse News: उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदारांचा प्रचार सुरू; नाशिकवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा दावा

Nashik Lok Sabha Constituency 2024: नाशिक मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता आहे. रोज नवे नाव पुढे येत आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या घटक पक्षांचे अनेक नेते उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने गोंधळाची स्थिती आहे.
Hemant Godse News
Hemant Godse NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik: नाशिक मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा की शिवसेना शिंदे गटाचा (cm eknath shinde) याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. यावरून जोरदार वाद सुरू आहे. अशातच मतदारसंघात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.

नाशिक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आग्रही मागणी आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे भवितव्य संकटात आहे.

दोन्ही पक्षांकडून या जागेवरील दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झालेला आहे. या दोन नेत्यांच्या भांडणात भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ मिळतो का? याचीदेखील चाचपणी भाजप करीत आहे. अशा स्थितीत दोन आठवड्यांपासून सुरू असलेला हा घोळ केव्हा संपणार याची उत्सुकता आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारी पक्षांचा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे अन्य उमेदवाराची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांचे नाव घेतले जात आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. त्यांचेदेखील नाव पुढे आले होते. या स्थितीत बोरस्ते यांना विरोध म्हणून खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. उमेदवारी बाबत त्यांच्यामध्ये चर्चाही झाली होती. त्यानंतरदेखील जागावाटप अथवा उमेदवार याविषयी काहीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे नेमका उमेदवार कोण? याबाबत शिंदे गटातच जोरदार स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे.

या गोंधळाचा लाभ घेऊन खासदार गोडसे यांच्या समर्थकांनी सोमवारी शहराच्या काही भागात पत्रक वाटप करून प्रचारायला सुरुवात केली. हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरू केला. हा संदेश देऊन अन्य इच्छुक तसेच गोडसे विरोधकांना धक्का देण्याचा हा प्लॅन होता. त्याची चर्चाही झाली. मात्र जागावाटप निश्चित नसताना गोडसे यांनी प्रचार सुरू केल्याने तो टीकेचा विषय झाला.

Hemant Godse News
Ajit Pawar News: नवी खेळी? बारामती लोकसभेसाठी आता अजित पवारदेखील उमेदवार...

नाशिक मतदारसंघात सध्या उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता आहे. रोज नवे नाव पुढे येत आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या घटक पक्षांचे अनेक नेते उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने गोंधळाची स्थिती आहे.

त्याचा फटका महायुतीच्या प्रचाराला बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महायुती उमेदवारी केव्हा जाहीर करणार याची चर्चा आहे. जागावाटप आणि उमेदवारी याबाबत किमान एक आठवड्याचा कालावधी लागू शकतो. या स्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे मात्र रोज प्रचारात सक्रिय राहून पुढे जात आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com