Uddhav Thackeray, Sanjay Raut Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : भाजपच्या माजी महिला खासदाराने ठाकरेंना डिवचलच, राऊतांना पोपटही म्हणाल्या; 'सकाळचा भोंगा, धंदे...'

Navneet Rana On Uddhav Thackeray And Sanjay Raut : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अन् एकनाथ शिंदेंची शिवसेनेतील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली.

Aslam Shanedivan

  1. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसावरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राजकीय वातावरण तापवले.

  2. संजय राऊत यांनी ५० आमदार फुटण्याचा दावा केल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.

  3. या पार्श्वभूमीवर राणा यांनी राऊतांवर पलटवार करत भाजप मित्रपक्षांची काळजी घेत असल्याचा दावा केला.

Amaravati News : आज राज्याभर हनुमान जयंतीचा उत्सहात पाहायला मिळत असून अमरावतीतील हनुमान गढीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले. ठाकरेंनी हनुमानजी किंवा हनुमान चालीसाचा विरोध न करता अमरावतीतील हनुमान गढीवर येऊन आशीर्वाद घ्यावेत, असा सल्ला दिला.

तसेच त्यांनी राज्यसभा खासदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बेचा समाचार घेत जोरदार टीका केली. त्यांनी थेट रावत यांचा पोपट असा उल्लेख करत त्यांनी महायुतीत फुट पाडण्याचे काम करू नये, अशी टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा विरूद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचे धार्मिक आणि राजकीय महत्त्व सांगताना श्रद्धा आणि भक्तीने अडथळे पार करता येतात, असा टोला ठाकरेंना लगावला आहे. तसेच देवाच्या घरी कोणी मोठं किंवा कोणीही लहान नसतं. कोणाही येण्यासाठी निमंत्रणही द्यायचं नसतं. देवाच्या घरी ज्याने त्याने इच्छेनं गेलं पाहिजे. पण त्यांनी जेव्हा हनुमान चालीसाला विरोध केला तेव्हा त्यांच्यापासून लोक दूर गेले. त्यांचे 40 लोक गेले. आताही जे त्यांचे उरले सुरले आहेत. ते देखील बाहेर जाण्याच्या माणसिकतेत आहेत. त्यामुळे ठाकरेंनी आता हनुमान चालीसाचे घरात पठण करावे, येथे येऊन हनुमानजींचे दर्शन घ्यावे असे म्हटलं आहे.

नवनीत राणा यांना राऊत यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बेचा प्रश्न विचारला असता त्या चांगल्याच खळवल्या. राऊत नावाचा पोपट फक्त भांडणे लावतो संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, "सकाळपासून ज्यांचा भोंगा सुरू होतो, त्या राऊत नावाच्या पोपटाकडे केवळ दोन लोकांमध्ये भांडणे लावण्याचेच काम उरले आहे. भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यामुळे राऊत यांनी आमच्यात फूट पाडण्याचे धंदे बंद करावेत.

राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मोठी अस्वस्थता असून महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा केला होता. तसेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अन् एकनाथ शिंदेंची शिवसेनेतील 25-25 असे एकूण 50 फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा करत हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मोठे संकेतही त्यांनी दिले होते. यावरूच नवनीत राणा यांनी राऊत यांना सुनावत त्यांचा पोपट असा उल्लेख केला.

याचबरोब राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर बोलणं टाळत खरातला १०० टक्के शिक्षा व्हायला हवी, त्याला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी केली. यावेळी त्या म्हणाल्या, नाशिकमधील खरात प्रकरणाने खूप मन दुखवले आहे. कारण आमच्याही धार्मिक भावना असून आम्ही धर्माचे काम करणारे आहोत. पण आता एखादा भोंदूबाबा असे काम करून महिलांचे शोषण करत असेल, त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खाजगी जीवन जर भंग होत असेल. तर अशा भोंदूबाबाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. जेणे करून भविष्यात असा गुन्हा कोणी करणार नाही.

FAQs :

1. नवनीत राणा यांनी कोणावर टीका केली?
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली.

2. हनुमान चालीसा वाद काय आहे?
हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

3. संजय राऊत यांनी काय दावा केला?
महायुतीतील ५० आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.

4. राणा यांनी राऊतांबद्दल काय म्हटलं?
त्यांना ‘पोपट’ म्हणत त्यांच्या विधानांचा समाचार घेतला.

5. या प्रकरणाचा राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
महायुती आणि विरोधकांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT