Navneet Rana Emotional : राज्यसभेचं तिकीट कापलं, नवनीत राणा भावूक; म्हणाल्या, 'कुठल्याही...'

Rajya Sabha Election BJP : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी अवघ्या दोन ओळीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.
Navneet Rana
Navneet RanaSarkarnama
Published on
Updated on

Navneet Rana News : भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांचा समावेश नाही. राणा यांना उमदेवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांना उमेदवारी देत भाजपने सर्व चर्चांना पूर्णविराम लागला.

उमदेवारांची यादी जाहीर होताच नवनीत राणा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या, 'संघर्ष करना मेरे लिए नई बात नही है, मै किसी भी मोडसे नई शुरुवात कर सकती हू.'

नवनीत राणा यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्या काहीशा भावनिक झालेल्या दिसल्या त्यातूनच आपण कुठल्याही वळणावरून नवीन सुरुवात करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. भाजपच्या राज्यसभेसाठी उमदेवार देत असताना लोकसभेत पराभूत उमेदवाराला संधी द्यायची नाही, असा नियम आखल्याचा फटका राणा यांना बसल्याची चर्चा आहे.

Navneet Rana
इराणमध्ये 165 शाळकरी मुलींचं एकाच वेळी दफन; JCB ने खोदलेल्या कबरींचे फोटो पाहून जग हादरलं!

भाजपचे उमेदवार

भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये नागपूरच्या विद्यामान नगरसेवक माया इवनाते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विनोद तावडे आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी देण्याना भाजपने आदिवासी, दलित, ओबीसी, मराठा असे जातीय समीकरण देखील साधल्याचे दिसून येते.

Navneet Rana
Bjp Masterstoke : भाजपचा 'मास्टरस्ट्रोक' : डॉ. महात्मेनंतर दिली रामराव वडकुतेंना राज्यसभेची संधी; धनगर समाजाला पुन्हा मिळालं 'दिल्ली'चं बळ!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com