Nawab Malik Joins Ajit Pawar group: Sarkarnama
विदर्भ

Winter Session 2023 : नवाब मलिकांचं अखेर ठरलं! अजित पवार गटात सहभागी...

Mangesh Mahale

Maharashtra Assembly Winter Session 2023 : वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक नागपूर येथील हिवाळी अधिवेशनास उपस्थित आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते कुठल्या गटात जाणार, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते.

विधानसभेत आल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) नेमके कोणत्या बाकावर बसणार, याबद्दल दोन्ही गटांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ते कुठल्या बाकावर बसणार, याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीतील दोन्हीही गट नवाब मलिक आपल्या गटात बसावेत, यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, मलिकांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे.

विधिमंडळ परिसरात आल्यानंतर सर्वात आधी अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. त्यानंतर अधिवेशनात ते सत्ताधाऱ्यांच्या मागील बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

अधिवेशनात आल्यावर मलिकांनी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT