Winter Session 2023 : शिवसेनेतील फुटीनंतर अधिवेशनात उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटणार

Uddhav Thackeray in Winter Session 2023 : विधान परिषदेत करणार विरोधकांवर आणि पक्ष सोडून जाणाऱ्यांवर प्रहार
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Vidhan Sabha Session 2023 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. सोमवारी (ता. 11) ठाकरे उपराजधानी नागपूरला दाखल होणार आहेत. मंगळवारी (ता. 12) ठाकरे हे विधान परिषदेतील कामकाजात सहभाग घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवस नागपुरात साजरा होत आहे. सोमवार आणि मंगळवार दोन दिवस नागपूरमध्ये अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्येही उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडी मधील घटकपक्ष म्हणून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी नागपुरातील मोर्चांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नियोजनाप्रमाणे शिवसेनेच्या आमदारांना व विदर्भातील नेत्यांना 'मातोश्री'वरून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल कळविण्यात आली आहे.

त्यानुसार विदर्भातील आमदार आपल्या पक्ष नेत्याच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारीला लागले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष नागपुरात येणार असल्याने संपूर्ण विदर्भातून कार्यकर्त्यांना सलग दोन दिवस नागपुरात थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विधानभवनात आल्यानंतर साहजिकच उद्धव ठाकरे हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर शाब्दिक प्रहार करतील या दुमत नाही. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार आहेत. अत्यंत कमी दिवसांचे अधिवेशन घेतल्याबद्दल ठाकरे गटाकडून भाजपला लक्ष्य करण्याची तयारी सुरू झाली आहे.

कोविडच्या नावाखाली महाविकास आघाडी सरकारने नागपुरात अधिवेशन घेण्याचा टाळलं. त्यावेळी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते, याचा स्मरण भाजपकडून करून दिलं जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या समवेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील विधिमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे पिता-पुत्राच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशन गाजवण्याची तयारी शिवसेनेकडून केली जात आहे. यासाठी नेत्यांच्या बैठकांचे सत्रही सुरू आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Assembly Winter Session 2023 : अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वाद पेटला; राष्ट्रवादीच्या कार्यालयातून आव्हाडांची नेमप्लेट हटवली...

ठाकरे गटाने विधान भवनात आक्रमक भूमिका घेतल्यास त्यावर 'काउंटर अटॅक' कसा करायचा याची व्यूहरचना एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी चालवली आहे. त्याला भाजपची पूर्ण साथ आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने ठाकरे सेनेच्या आमदारांना, तर अजित दादाच्या गटाने शरद पवार गटाच्या आमदारांना घेण्यासाठी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे कागदपत्रे 14 दिवस आणि प्रत्यक्षात दहा दिवस चालणारे नागपुरातील हिवाळी अधिवेशन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन गट आपसातील वादामुळे नक्कीच गाजवतील असे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटाचा वाद हिवाळी अधिवेशनात वाढेल हे ठामपणे सांगण्यात येत होते. अशातच सुरुवातीला विधानभवनातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात येणार होते.

पक्षातील नेत्यांच्या पाट्या लागल्यानंतर गुरुवारी (ता. 7) सकाळी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी शरद पवार गटातील नेते व विधिमंडळात आक्रमक भूमिका घेणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पाटी करण्यात आली. या प्रकारानंतर वादाला तोंड फुटले. त्यामुळे संपूर्ण अधिवेशन भर राज्यातील दोन पक्षांच्या चार गटांमधील वाद संपूर्ण राज्याला बघायला मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Manoj Jarange : येवल्याच्या येडपटाला पाडू, त्यांना हिसका दाखवायला वेळ लागणार नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com