Letter Of Naxal In Gadchiroli For Protest. Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli Naxal : खाणींविरोधातील आंदोलन तीव्र होणार; गुरुवारी माओवाद्यांनी पुकारला बंद

Todgatta Village : पत्रातून केली नेत्यांना सोडण्याची मागणी; मोदी, आरएसएसचा एकेरी उल्लेख

प्रसन्न जकाते

Police in Alert Mode : गडचिरोली जिल्ह्यात होत असलेल्या खाण प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करा, असं आवाहन करणारं पत्र माओवाद्यांनी प्रकाशित केलं आहे. तोडगट्टात आंदोलन करणाऱ्या आदिवासी नेत्यांना पोलिसांनी अटक केलीय. या कारवाईच्या विरोधात माओवाद्यांनी गुरुवारी (ता. 30) बंद पुकारलाय. माओवाद्यांच्या या पत्रकबाजीमुळं गडचिरोली पोलिस सतर्क झाले आहेत.

तोडगट्टाजवळ आदिवासी नेत्यांनी ग्रामस्थांसह पोलिसांना घेरलं होतं. सोमवारी (ता. 20) हा प्रकार घडल्यानंतर सध्या संपूर्ण एटापल्ली तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आलाय. अशात माओवाद्यांनी पत्र काढत गडचिरोली बंद पुकारलाय. बंददरम्यान हिंसक घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आता पोलिस कामाला लागले आहेत. (Naxal From Gadchiroli Calls For Strike on 30 November To Protest Mining In District)

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) गडचिरोली पश्चिम सब झोनल ब्यूरो प्रवक्ता श्रीनिवास यांनं हे पत्र काढलंय. पत्रात गडचिरोलीतील उत्तरेकडील झंडापार पासून दक्षिणेकडील बाबुलाई पहाडापर्यंतच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करून सरकार केवळ खाणींना परवानगी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात एकेरी भाषेचा वापर करीत श्रीनिवासनं गडचिरोली, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख केलाय.

तोडगट्टा येथे सुमारे 255 दिवसांपेक्षाही जास्त कालावधीपासून खाण विरोधात आंदोलन सुरू आहे. आदिवासींच्या या आंदोलनाला माओवाद्यांनी पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आदिवासी नेत्यांना मुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि अन्य लोकप्रतिनिधींनी यासाठी पोलिसांकडं पाठपुरावा करावा, असंही श्रीनिवासनं म्हटलय. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्यात कलम 144 लावत पोलिस आदिवासींना त्रास देत आहे. त्यामुळं गुरुवार, 30 नोव्हेंबरला माओवादी गडचिरोली बंद पाळणार आहेत. आदिवासी ग्रामसभांनी आंदोलन आणखी तीव्र करावं अशी चिथावणीही पश्चिम सब झोनल ब्यूरोनं दिलीय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांकडून साहित्यवाटप

खाणविरोधी आंदोलनात सहभागी नेत्यांनी आदिवासींसह पोलिसांना तोडगट्टाजवळ घेरल्यानंतर आठ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेनंतर एटापल्ली तालुक्यातील तणावात चांगलीच वाढ झालीय. आदिवासी नेते पोलिसांवर गावात शिरत तोडफोड केल्याचा आरोप करीत आहेत. पोलिसांनी हे आरोप फेटाळलेय. आंदोलनस्थळी असलेल्या झोपड्या आदिवासींनी स्वयंस्फूर्तीनं हटविल्याचं पोलिस सांगत आहेत. अशात पोलिसांनी तोडगट्टा, वांगेतुरी येथे खास मेळावा घेतला.

राज्याच्या विशेष कृती विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी तातडींनं वांगेतुरीला भेट दिली. साळुंके यांच्या हस्ते आदिवासींना साहित्य वाटप करण्यात आलं. सुमारे 300 ते 350 आदिवासींना धोतर, साड्या, सलवार सूट, ब्लँकैट, लोअर, टी-शर्ट, स्वेटर, चप्पल, फवारणी पम्प, स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य, भांडी आणि इतर जीवनावश्यक साहित्याचं वितरण करण्यात आलं. राज्य राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक पी. एस. रणपिसे, गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख, हेडरीचे उपअधीक्षक बापुराव दडस यावेळी उपस्थित होते. वांगेतुरीचे नवनियुक्त ठाणेदार महेश विधाते, कृती शाखेचे प्रभारी धनंजय पाटील सध्या या भागात लक्ष ठेऊन आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT