Nagpur Naxal Threat : मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना धमकीचे सत्र सुरूच

Issue Of Mining : गडचिरोलीतील लोहखाण प्रकल्पाला पाठिंबा न देण्याचा माओवाद्यांचा इशारा
Dharmarao Baba Aatram Gets Life Threat by Naxal In Gadchiroli.
Dharmarao Baba Aatram Gets Life Threat by Naxal In Gadchiroli.Google
Published on
Updated on

Gadchiroli News : सूरजागड प्रकल्पासह गडचिरोलीत होत असलेल्या खाण प्रकल्पांना पाठिंबा देऊ नका, अन्यथा परिणामांसाठी तयार राहा, अशी धमकी माओवाद्यांनी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना दिली आहे. धमकीचं हे सत्र सुरूच आहे. आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाचे ते आमदार असून गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत.

पूर्व विदर्भातील गोंदिया व गडचिरोली हे दोन जिल्हे माओवाद प्रभावित आहेत. गडचिरोलीतील तोडगट्टा येथे सुमारे 250 दिवसांपेक्षाही जास्त कालावधीपासून खाण प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. सुमारे सहा दिवसांपूर्वी तोडगट्टा येथील आंदोलकांनी पोलिसांना घेरलं होतं. तणाव निर्माण झाल्यानं संपूर्ण एटापल्ली तालुक्यात सध्या कलम 144 लागू करण्यात आलय. (State Minister Dharmarao Baba Atram Got Life Threat By Naxal Of Gadchiroli Again Asked Not To Support Mining In District)

Dharmarao Baba Aatram Gets Life Threat by Naxal In Gadchiroli.
Gadchiroli News : तोडगट्टाजवळ आदिवासींनी पोलिसांना घेरलं, आठजण ताब्यात

यासंदर्भात आत्राम यांनी नागपूर येथे ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितलं की, आपल्याला माओवाद्यांकडून सलग धमकी मिळत आहे. आपण यासंदर्भात सरकारला कळविलं आहे. सातत्यानं धमक्या मिळत असल्यानं पोलिस आणि गृहविभाग आपल्या पद्धतीनं योग्य ती खबरदारी घेत आहे. आपणही व्यक्तीगत पातळीवर स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत आहोत. माओवाद्यांचा गडचिरोलीतील विकासाला विरोध आहे. एटापल्ली तालुक्यात होत असलेले खाण प्रकल्प त्यांना नको आहेत. त्यामुळं ते लोकप्रतिनिधींनाही धमकावत आहेत.

गडचिरोलीचा परिपूर्ण विकास व्हावा, ही आपल्यासह सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळं विकासाच्या दृष्टीने येथे प्रकल्प आणले जात आहेत. परंतु माओवादी त्याला विरोध करीत आहे. लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्याला अशा धमक्यांना घाबरून चालणार नाही. आपल्याला आपलं काम करतच राहावं लागणार आहे. माओवादी त्यांचं काम करीत आहेत, आपण आपलं काम करीत राहणार आहोत, असं आत्राम यांनी स्पष्ट केलं. गृहविभाग आणि गडचिरोली पोलिसांनी आपल्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सध्या जी पोलिस सुरक्षा आहे, त्यात वाढ करायची किंवा कसं याचा निर्णय सरकार घेईलच, असं ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एटापल्ली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून खाणविरोधी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र-छत्तीसगड सिमावर्ती भागात या आंदोलनानं जोर धरलाय. परिसरातील 40 ग्रामसभा आंदोलनात सहभागी झाल्याय. अशात महाराष्ट्र-छत्तीसगड सिमेवरील माओवादी कारवाया रोखण्यासाठी पोलिसांनी एका रात्रीतून वांगीतुरी येथे पोलिस ठाण्याची उभारणी केली. 20 नोव्हेंबरला वांगीतुरीकडं जाणाऱ्या गडचिरोली पोलिस आणि सी-60 कमांडो पथकाला तोडगट्टाजवळ आंदोलकांनी घेरलं. याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या एटापल्ली तालुक्यात तणावाचं वातावरण आहे. माओवादी पोलिस आणि सरकारच्या विरोधात आंदोलनकर्ते नेते व आदिवासींना चिथावणी देण्यााच प्रयत्न करीत आहेत.

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत भेट देऊन गेलेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माओवाद्यांनी एकाची हत्या केली होती. अद्यापही माओवाद्यांकडून हे हत्यासत्र सुरूच आहे. मध्यंतरीच्या काळात गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या तीव्र अभियानामुळं हिंसक कारवायांची संख्या घटली होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून गडचिरोलीतील माओवादी पुन्हा डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे. सध्या त्यांनी एटापल्ली तालुक्यात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Dharmarao Baba Aatram Gets Life Threat by Naxal In Gadchiroli.
Naxal Attack : नक्षलवाद्यांकडून गाव पाटलाची गोळ्या झाडून हत्या; घटनास्थळी पत्रक सोडत म्हटले की...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com