Akola News : मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे नामदेवराव जाधव यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार पुणे येथे घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलंय. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळं हे कृत्य केल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा प्रकार अशोभनीय असल्याचं म्हटलंय. खुद्द शरद पवारही अशा प्रकारांना पाठिंबा देणार नाहीत, असं मिटकरी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच तापलाय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नामदेवराव जाधव यांनी गंभीर आरोप केलेत. पवार मराठा नव्हे तर कुणबी आहेत. त्यांनी ओबीसी ही जात लावत आरक्षण लाटलं, असा गंभीर आरोप जाधव यांनी केला होता. (NCP Ajit Pawar Group's MLC Amol Mitkari From Akola Says Ink Smear On Namdevrao Jadhav Is Indecent)
जाधवांच्या या टीकेनंतर हा वाद चांगलाच पेटला. शनिवारी (ता. १८) राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जाधव यांच्या तोंडाला काळं फासलं. या प्रकाराचा आमदार अमोल मिटकरी यांनी निषेध केला. आजपर्यंत शरद पवार यांच्यावर अनेकांनी टीका केलीय. त्यांच्यावर हल्ल्याचादेखील प्रयत्न झालाय. मात्र, पवारांनी त्याचं प्रत्युत्तर अशा पद्धतीनं दिलं नाही. लोकशाहीत झुंज निर्माण करण्याची जी प्रवृत्ती निर्माण होतेय, त्याचा निषेध आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना हे आवडणार नाही. त्याचं समर्थनही ते करू शकणार नाहीत, असं मिटकरी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शाईफेक करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवार गट नसल्याचा दावाही मिटकरी यांनी केलाय. काही लोक राष्ट्रवादीच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवणारे आहेत. त्यांचं हे कृत्य असल्याचं ते म्हणाले. नामदेव जाधव नावाची व्यक्ती स्वत:ला राजमाता जिजाऊ यांचे वंशज असल्याचा दावा करते. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आलीय. स्वराज्य संकल्पक महाराजा राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी रोहित पवारांना या प्रकरणी पत्र लिहिलंय. रोहित पवारांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत स्वतःच्या फायद्यासाठी कुणी असं करत असेल तर हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. अशातच शाईफेक करण्याचा प्रकार घडल्यानं अजित पवार गटानंही त्यावर नाराजी व्यक्त केलीय.
Edited by : Prasannaa Jakate
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.