Amol Mitkari : अंजलीताई जरा दमानं घ्या.. तुमचं राजकारण काय ते माहितीय, मिटकरींचा ट्विट बॉम्ब

Protects Chagan Bhujbal : दमानिया यांच्या दोन पोस्टला दिले सडेतोड प्रत्युत्तर
Amol Mitkari Tweets on Anjali Damaniya
Amol Mitkari Tweets on Anjali DamaniyaGoogle
Published on
Updated on

Akola Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अकोला येथून विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर ट्विटबॉम्ब (एक्स) टाकला आहे. अंबड येथे झालेल्या ओबीसी सभेनंतर अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत सोशल माध्यमावर टीका केली. त्याला आमदार मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

अंबडमधील सभा आटोपल्यानंतर गेल्या १९ ते २० तासांपासून अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्यासंदर्भात पोस्ट टाकण्यास सुरुवात केलीय. सुरुवातीला भुजबळ यांच्या संपत्तीचे फोटो, त्यानंतर सांताक्रूझबाबतची पोस्ट आणि दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भुजबळांविरुद्ध पत्रकार परिषदेचे ट्विट करीत दमानिया यांनी एकापाठोपाठ भुजबळ यांच्यावर सोशल टीकास्त्र डागले. दमानिया यांच्या या सर्व हल्ल्यांना आमदार मिटकरी यांनी एकाच ट्विटबॉम्बनं प्रत्युत्तर दिलं. (NCP Ajit Pawar Groups MLC Amol Mitkari Counter Attacks Anjali Damaniya For Criticism on OBC Leader & Minister Chagan Bhujbal)

‘अंजलीताईंचे आतताई राजकारण हा केवळ प्रसिद्धीचा खटाटोप आहे’, अशी टीका आमदार मिटकरी यांनी केली. ‘आज भुजबळांचे भाषण ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली. कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ? कुठेतरी असे वाटते की, भुजबळांना फडणवीसांनी जरांगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे. आता तावा तावाने भुजबळ कसे बोलतात पाहा.... आता छातीत कळ नाही येत ? जेल मधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे’, अशी टीका दमानिया यांनी केली होती.

दमानिया यांच्या समर्थक रोशनी राऊत यांच्यासह अनेकांनी भुजबळ यांच्याविरोधात सोशल युद्ध सुरू केलं. त्यामुळं त्याला उत्तर देण्यासाठी आमदार मिटकरी सरसावले. ‘आपण ज्या आतताईपणे राजकारण करू पाहत आहात, तो केवळ आपला पब्लिसिटी स्टंट आहे. एखाद्या व्यक्तीविरुद्ध इतक्या टोकाचा रोष करण्यामागचे आपले नेमके राजकारण सर्व महाराष्ट्राला माहित आहे. जरा दमानं घ्या.’ असा खोचक सल्ला देत मिटकरी यांनी दमानिया व त्यांच्या समर्थकांना उत्तर दिलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंजली दमानिया या भुजबळ यांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्यासाठीही गेल्या होत्या. आधीच पोलिसांकडून अंजली दमानिया यांना अडवण्यात आलं. अंजली दमानिया यांना सांताक्रूझ पोलिसांनी ताब्यात घेतलं. अंजली दमानिया यांना पोलिसांनी जुहू पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. यावेळी अंजली दमानिया आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून अंजली दमानिया आणि छगन भुजबळ यांच्यात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दमानिया यांनी भुजबळ यांना न्यायालयातही खेचलं होतं.

Edited by : Prasannaa Jakate

Amol Mitkari Tweets on Anjali Damaniya
Akola MLA Amol Mitkari : ‘व्होकल फॉर लोकल’ला मिटकरींची साद; स्थानिक व्यावसायिकांना मदतीचा हात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com