Ajit Pawar on Tanaji Sawant Sarkarnama
विदर्भ

Video Ajit Pawar : तानाजी सांवतांनी ताणलं, अजितदादांनी ठणकावलं; कडक शब्दात दिलं उत्तर

Ajit Pawar on Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला कोणी काही बोलले तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत," असं अजितदादांनी म्हटलं आहे.

Jagdish Patil

Nagpur News, 31 August : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत.

अशातच आता तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला कोणी काही बोलले तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत," अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "मला बाकीचे काही बोलायचे नाही. माझ्या संदर्भात असेल ते बोला. याने असं केलं त्यानं तसं केलं, मला कुणाशी काहीही देणं घेणं नाही. मी जनसन्मान यात्रेच्या सुरूवातीलाच ठरवलं आहे की, मला कोणावर टीका करायची नाही. कोणी मला काही बोललं तर माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत.

मी काम करतो. मी कामाचा माणूस आहे," असं म्हणत अजितदादांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. तसंच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चांगल्या योजना महाराष्ट्रातील जनतेला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ते सांगण्याचे काम आमचे चालू असल्याचंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत ?

धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत म्हणाले, "आपण हाडाचा शिवसैनिक असून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं कधीच जमलं नाही. आज मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात, ते सहन होत नाही."

सत्तेतून बाहेर पडलेले बरं

सावंत यांचं हे वक्तव्य अजित पवार गटाच्या चांगलंच जिव्हारी लागलं असून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आणि आमदारांनी सावंत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच 'तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं,' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT