Eknath Khadse, Mandakini Khadse
Eknath Khadse, Mandakini Khadse Sarkarnama
विदर्भ

Mandakini Khadse : खडसे पुन्हा अडचणीत ; 'या' प्रकरणात SIT चौकशी होणार

सरकारनामा ब्युरो

Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात एसआयटी (SIT)चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुक्ताईनगर येथील गौण खनिज प्रकरणात त्यांची चौकशी होणार आहे.

नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात याबाबत लक्षवेधी मांडली होती. या विषयावर चर्चा झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब विखे यांनी मंदाकिनी खडसे यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहे.

मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर येथील गौण खनिजामध्ये राज्य सरकारचा ४०० कोटीचा महसूल बुडवला आहे, असा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या जळगाव दूध संघ निवडणुकीत मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा मोठा पराभव झाल्याने दूध संघावरील पकड आता कमी झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपेचे नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचा विजय असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ बरखास्त करण्यापूर्वी मंदाकिनी खडसे या संघाच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे खडसे गटाला हा झटका मानला जात आहे.

भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसे यांचा तब्बल 76 मतांनी पराभव केला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना 255 ते मिळाली आहेत, तर मंदाकिनी खडसे यांना 179 मते मिळाली आहेत. त्यामुळे खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांचा गृहतालुका असलेला मुक्ताईनगरमधून मंदाकिनी खडसे यांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT