Wardha Lok Sabha Seat : NCP News : Sarkarnama
विदर्भ

Wardha Lok Sabha Seat : काँग्रेसकडे असलेल्या वर्धा लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही; उमेदवारीसाठीही सरसावले नेते!

सरकारनामा ब्यूरो

Vidarbha News : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) निवडणुकांच्या तयारीसाठीची बैठक मुंबई येथे पार पडली. याबैठकीत वर्धा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP News) दावा केला आहे. वर्धा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी, असा सर्वांनीच सूर आवळला.

सद्यस्थितीत असलेल्या काँग्रेस पक्षाकडे असलेले वर्धा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच उमेदवार तुल्यबळ लढत देवू शकतात, असा काहींनी दावा केला आहे. नुकत्याचा झालेल्या बैठकीत विदर्भातील जागांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनीही वर्धा लोकसभा मतदारसंघाबाबत आढावा घेतल्याचे समजते.

वर्ध्यातून राष्ट्रवादीचाच आणि तो ही वर्धेतलाच उमेदवाराला लढण्याची संधी दिली पाहिजे, असा एक सूर पक्षांतर्गत आहे. राष्ट्रवादीचे सुबोध मोहिते याबाबत म्हणाले, मी ज्यावेळी रामटेकचा खासदार होतो, त्यामध्ये मोर्शी भागाचा समावेश होत होता. म्हणून या ठिकाणी लढण्यास माझी पात्रता आहे, असे दावा त्यांनी केला आहे.

तसेच आमदार देवेंद्र भुयार व इतरी काही नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी हर्षवर्धन देशमुख किंवा मग समीर देशमुख यांचा ही उमेदवारीसाठी विचार करण्यास सुचविलेले आहे. तर उमेदवारीबाबत एकमत होतच नसेल तर मी लढण्यास तयार आहे, असे समता परिषदेच दिवाकर गमे यांनी म्हंटले आहे.

सहकारातील नेते सुधीर कोठारी यांनी मात्र वर्धा मतदारसंघात पक्षाचा प्रभाव पुरेश्या प्रमाणात नसल्याचे स्पष्टपणे मांडले. मात्र पक्षश्रेष्ठींनी योग्य ते ठरवावे, ते जे उमेदवार ठरवतील, त्यांच्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करू, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर समीर देशमुख यावेळी म्हणाले की, "शरद पवार साहेबांकडे याबाबत आम्ही भावना व्यक्त केल्यात. उमेदवार स्थानिकच हवा यावर सर्वांची सहमती आहे, पणे उमेदवार कोण असेल, आताच काही सांगता येणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT