NCP Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उफाळली गटबाजी, फायदा भाजपला !

Nagpur : बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना बोलावले नाही.
Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.
Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.Sarkrnama
Published on
Updated on

factionalism in the Nationalist Party : विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना बोलावले नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे यांनी पत्र परिषदेत केला. (Bahujan community workers were not invited in the program)

पक्षात गटबाजीचे राजकारण सुरू झाल्याची चाहूल लागली आहे. या घटनेनंतर बहुजन समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्षातील गटबाजी उफाळून आल्याने याचा थेट लाभ विरोधी पक्ष असलेल्या भाजपला होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन कार्यक्रम १० जून रोजी वानाडोंगरी येथील बाबडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना देण्यात आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेश बंग यांच्या आदेशानुसार हेतू पुरस्सर बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप खाडे यांनी केला.

पत्रपरिषदेत खाडे यांनी पुढे सांगितले की, हिंगणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून मागील पाच ते सहा वर्षांपासून कार्यरत आहे. भाजपची सत्ता असताना मागील काही वर्षांपूर्वी अत्यंत जवळच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आम्ही पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धुरा सांभाळली. त्यानंतर पार पडलेल्या निवडणुकीत तीन जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य निवडून आणले.

Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.
Jayant Patil यांनी व्यक्त केला संशय, बघा नेमकं काय म्हणाले ? | NCP | CM Eknath Shinde | Sarkarnama

पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत असतानाही पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून तालुकाध्यक्ष पदावरून बरखास्त करण्यात आले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातूनही पक्षात कार्यरत असलेल्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात जिल्हा परिषदेच्या माझी महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांचाही समावेश आहे.

बहुजन समाजातील कुणबी प्रवर्गात मोडत असल्याने मतदारसंघात बहुजन समाजाचे नवीन नेतृत्व उदयास येऊ नये, यासाठी हा खटाटोप केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष पुंड यांची नियुक्ती होत असताना या नावालाही विरोध करण्यात आला. इतर समाजातील एकाही कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले नाही, असाही गंभीर आरोप करण्यात आला.

Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.
Nagpur ZP News : माजी सभापतीने काढला माजी मंत्र्याचा बाप, नंतर उडाली शाब्दिक चकमक!

ज्येष्ठ नेत्यांसाठी केलेल्या आंदोलनाकडेही पाठ..

राष्ट्रवादी काँग्रेस हिंगणा तालुक्याच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानसभेतील निलंबनाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातही आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनात रमेश बंग स्वतः तर आलेच नाही. पण पक्षातील कार्यकर्त्यांनी जाऊ नये, असा संदेश दिला. यामुळे वरिष्ठ नेत्यांविषयी त्यांच्या मनात आदर नसल्याचे खाडे यांनी सांगितले.

निवडणुकीची रसद परस्पर गहाळ..

हिंगणा विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवाराला खर्चासाठी निधी पाठविला जातो. हा निधी निवडणुकीच्या काळात मंत्री बंग यांच्याकडे पाठविण्यात येतो. मात्र हा निधी निवडणुकीत उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला दिला जात नाही. याचा प्रत्यय यांना नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आला. यामुळेच हिंगणा नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला गमवावी लागली, असा आरोप खाडे यांनी केला.

Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.
Nagpur Political News: गडकरी, फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे नागपुरात ‘या’साठी येणार एका मंचावर !

पंचायत समिती सभापती निवडणुकीतही बहुजन समाजातील महिला रूपाली खाडे सभापती होऊ नये, यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. पक्ष हा आपल्या बंग वाड्यापुरताच मर्यादित राहिला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. पुत्र प्रेमापोटी हा सर्व खटाटोप त्यांनी सुरू केला आहे. अल्पसंख्यांक समाजातील नेतृत्व असतानाही बंग यांना पक्षाने तीन वेळा आमदार, महामंडळाचे अध्यक्षपद व मंत्रिपद दिले. आता वयाची ८० वर्ष त्यांनी ओलांडले आहे. यामुळे आता तरी वयाचे भान ठेवून त्यांनी गटातटाचे राजकारण करू नये, अशी अपेक्षा खाडे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाच्या घरातील पक्ष नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हा पक्ष मोठा केला आहे. यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढविणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ असताना पक्ष मजबूत करण्याऐवजी पक्षाला खिळखिळे करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा वारंवार अपमान केला जात आहे. हे कार्यकर्ते पक्ष सोडून जातील, याची वाट बघत आहेत.

Ujwala Bodhare, Ramesh Band and Pravin Khade.
Nagpur Politics News : डॉ. देशमुखांची सावनेरातून तयारी, तर मेघेंच्या बालेकिल्ल्यातून लढण्याचा केदारांना आग्रह !

आम्ही बहुजन समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते हा पक्ष सोडून कदापिही कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. त्यांच्या या संकुचित स्वभावामुळे मागील तीन वेळा हिंगणा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवाराचा पराभव झाला. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास याचा फायदा बलाढ्य असलेल्या भाजपला (BJP) होऊ शकतो. याचे आत्मचिंतन त्यांनी करावे. वयाचे ८० वर्ष गाठल्याने त्यांनी आता राजकारणातून (Politics) निवृत्ती घ्यावी, असे आवाहन खाडे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उज्वला बोढारे उपस्थित होत्या.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com