NCP Nagpur Melava: नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर सुरु आहे. या शिबिरात राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी विदर्भातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच जर तुम्हाला इथं फक्त दोन तासांसाठीच यायचं असेल तर इकडं येऊ नका, अशा शब्दांत पटेलांनी त्यांना सुनावलं आहे. या शिबिरात त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहितही केलं.
"विदर्भात आमचे अनेक मंत्री येतात, पण मी कोणाविषयी काही विशेष सांगू इच्छित नाही. पण पर्यटनासाठी मेहेरबानी करुन येऊ नये. आमच्याकडं दोन तासांसाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे किंवा तटकरेंकडं जाऊन हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करुन आलो याला काहीही अर्थ नाही. दोन तासांच्या पर्यटनासाठी आमच्याकडं येऊ नये, यायचं असेल तर योग्य रितीनं आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, त्यांना ताकद कशी मिळेल? याच्यासाठी यायचं असेल तर जरुर या. फक्त झेंडा वंदन कार्यक्रमासाठी येऊ नका. पालकमंत्र्यांच्या भूमिकेतच तुम्ही इथं यायला हवं," अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना चांगलंच सुनावलं.
वाशिम - दत्तात्रय भरणे
बुलडाणा - मकरंद पाटील
भंडारा, गोंदिया - बाबासाहेब पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आपण विदर्भाकडं विशेष लक्ष देऊ शकलो नाही. कारण काँग्रेस पक्षासाठी आपण विदर्भात कायम कमी जागा लढवल्या. सध्या आपण महायुतीमध्ये आहोत, इथंही भाजपसाठी आपण विदर्भात कमी जागा लढवल्या. महायुतीत आपण विदर्भात ७ पैकी ६ जागी जिंकलो फक्त एक जागा मैत्रीपूर्ण लढतीमुळं हरलो. त्यामुळं विदर्भात आपली ताकद नाही असं नाही, अशा शब्दांत प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.