Praful Patel NCP
Praful Patel NCP

NCP Ajit Pawar: अजित पवारांचं ठरलं! महापालिका निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

NCP Ajit Pawar: येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या युती-आघाडीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Published on

NCP Ajit Pawar: येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांच्या युती-आघाडीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वात आधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सूचक विधान पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

Praful Patel NCP
Jayant Patil: पडळकरांच्या अश्लाघ्य टीकेवर जयंत पाटलांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, तुम्हीच...

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, "मुंबई पुरतं मी सांगू शकतो की थोडंफार विचार सुरु आहे की महायुती म्हणून आम्ही लढलं पाहिजे. पण यावर अद्याप अधिकृत चर्चा झालेली नाही. महायुती म्हणून मुंबईत आपण स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायची नाही हे आम्हाला पक्ष म्हणून योग्य वाटत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं आहे की, स्थानिक स्तरावर तुम्हाला शक्य असेल किंवा तसं वाटलं तर युती जरु करावी. पण वरुन आम्ही या नेत्यांना-कार्यकर्त्यांना महायुती करा किंवा इतर काही युती करा असे कुठलेही आदेश देणार नाही"

Praful Patel NCP
Sanjay Raut : "राहुल गांधींमध्ये जी हिंमत ती पंतप्रधानांमध्ये नाही, 75 वर्षांचे झाले पण..."; संजय राऊतांची मोदींवर टीका

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या बोलण्यावरुन मुंबई महायुती म्हणून राष्ट्रावीद काँग्रेस लढणार आहे पण इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याची भूमिका पक्षाची असल्याचं दिसून येतं आहे. पण असं असलं तरी जर स्थानिक स्तरावरील नेते आणि कार्यकर्त्यांना जर युती करावीशी वाटली तर ते करु शकतात.

Praful Patel NCP
Padalkar Vs Atre: कुठे पडळकर अन् कुठे अत्रे! यशवंतरावांवर टीकेनंतर अत्रेंनी मागितली होती माफी; काय होता किस्सा? जाणून घ्या

येत्या तीन महिन्यात महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत निवडणूक पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टानं दोन दिवसांपूर्वीच याबाबत निकाल देताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणाऱ्या निवडणूक आयोगाला फटकारलं. तसंच आता आणखी वेळ वाढवून देता येणार नाही, त्यामुळं ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणूक घेण्यात याव्यात असं कोर्टानं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com