Amravati News: राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायती निवडणुकांची धामधूम संपली असून सर्वच राजकीय पक्षांच्या आघाडी,युतीच्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.या निवडणुकांच्या निकालाच्या आदल्यादिवशीच विदर्भाच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी धक्कादायक अपडेट समोर येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लाडके नेते आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके (Sanjay Khodke) यांना कारनं उडवल्याची भीषण घटना शनिवारी(ता.20) घडली आहे. कारच्या धडकेत आमदार संजय खोडके हे काही अंतर फेकले गेले होते. या अपघातामध्ये ते जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुढील महिन्यात होत असलेल्या अमरावती महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहरात कार्यकर्त्यांच्या नियोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला कारनं धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
अमरावती (Amravati) शहरात झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.खोडके यांना उपचारासाठी अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच खोडके यांच्या समर्थकांनी रुग्णालयाकडे धाव घेतल्याचं दिसून आलं.
आमदार संजय खोडके यांची या अपघातानंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले,दुपारी 3 वाजता माझ्या दुचाकीनं जात असताना अपघात झाला आहे. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून,रिपोर्टही नॉर्मल आले आहेत.आपण सुखरूप असून काळजी करण्याचं कारण नसल्याचंही खोडके यांनी स्पष्ट केलं आहे.
आमदार खोडके यांनी याचवेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस रुग्णालयातच अंडर ऑब्जर्व्हेशन राहणार असल्याचंही म्हटलं आहे.तसेच कार्यकर्त्यांनी माझ्या प्रकृतीची चिंता करू नये, माझी प्रकृती ठीक आहे. पण अमरावतीत होत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा यशस्वी करावा' असं आवाहनही खोडके यांनी केलं आहे.
या अपघातात खोडके यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. मात्र,निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशीच खोडके यांचा अपघात झाल्यानं शहरात चर्चेचा विषय ठरला होता. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. यापैकी सहा आमदार निवडून आले आहेत. विदर्भातील स्ट्राईट 99 टक्के राहिला. पण आता अमरावतीच्या संजय खोडके यांना विधान परिषदेत पाठवून राष्ट्रवादीने आमदारांची संख्या 7 केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.