Police Employee Suicide
Police Employee Suicide  Sarkarnama
विदर्भ

राष्ट्रवादीच्या आमदाराच्या बॉडीगार्डने कौटुंबिक कलहातून केली आत्महत्या...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा सुरक्षारक्षक असलेल्या पोलिस जवावाने आत्महत्या केली. ड्युटी संपल्यानंतर घरी गेल्यानंतर रात्री त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर कामाचा कुठलाही तणाव नव्हता, असे अहेरी पोलिसांनी सांगितले.

प्रमोद शोकोकर असे मृत जवानाचे नाव आहे. स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून प्रमोदने जीवनयात्रा संपविली. मुळचा गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा जवान गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी (Aheri) उपविभागाअंतर्गत ताडगाव पोलिस (Police) स्टेशनमध्ये तो कर्तव्यावर होता. तेथून काही दिवसांपूर्वी तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांचा सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाला होता आणि नियमित काम करीत होता. अचानक आत्महत्येसारखे (Suicide) टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबासह त्याच्या सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे.

यापूर्वी प्रमोद माजी आमदार अंबरीशराव आत्राम आणि माजी आमदार दीपक आत्राम यांच्याकडेही सुरक्षारक्षक म्हणून तैनात होता. त्या काळात त्याने आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावले, असे त्याचे सहकारी सांगतात. पण गेल्या काही दिवसांपासून तो तणावात वावरत होता. कुटुंबातील सदस्यांसोबत त्याचा वाद सुरू होता. त्यातूनच तो त्रस्त झाला होता. पोलिस तपासात काय ते निष्पन्न होणारच आहे. पण कामाचा तणाव किंवा इतर कोणत्याही कारणाने त्याने हे पाऊल उचलले नाही, या निष्कर्षावर सध्यातरी पोलिस पोहोचले आहेत. पण अंतिम निष्कर्ष अद्याप काढलेला नाही.

आत्महत्येच्या या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कौटुंबिक कलहातून त्रासल्याने प्रमोदने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पण अंतिम निष्कर्षावर आम्ही अद्याप पोहोचलेलो नाही. आमदारांच्या सुरक्षा रक्षकाची ड्युटी पक्की नसते, तर पाळ्यांनुसार ती बदलत असते. घटनेच्या दिवशी तो ड्युटीवरच होता. तेथून पॉवर हाऊस कॉलनीतील घरी गेल्यानंतर त्याने आत्महत्या केली.

- अमोल ठाकूर

उपविभागीय पोलिस अधिकारी, अहेरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT