NCP leader Dharamrao Baba Atram addresses the media amid rising speculation over the party’s national president post, backing Sunetra Pawar while leadership discussions continue. Sarkarnama
विदर्भ

Dharamrao Baba Atram : 'राष्ट्रवादीचं अध्यक्ष सुनेत्रा पवारांनाच करावं...'; धर्मरावबाबा आत्राम यांचा प्रफुल पटेलांच्या नावाला विरोध?

Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून वाद तीव्र झाला असून धर्मराव बाबा आत्राम यांनी सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व द्यावे अशी मागणी करत अप्रत्यक्षपणे प्रफुल्ल पटेल यांच्या नावाला विरोध केला आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावरून वाद पेटला आहे. अनेक आमदारांनी सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्ष करावे अशी मागणी केली आहे. दुसरीकडे राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नव्हे तर पाटील असावा असं विधान केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनीसुद्धा सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्ष करावे अशी मागणी करून अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नावाला विरोध केला आहे.

प्रफुल पटेल यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही असे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, पक्षाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने पुढील सर्व प्रक्रिया करण्याचे अधिकार मलाच आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष कोणाला करायचे याचे अधिकारी आमच्याच पक्षाला आहेत. राज ठाकरे किंवा संजय राऊत हे आमच्या पक्षाचे नाहीत. त्यांना तो अधिकारसुद्धा नाही. त्यांना विचारण्याची आम्हाला गरजही नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया पटेल यांनी या वादावर दिली आहे.

यावर बाबा आत्राम यांनी आपले मत व्यक्त करताना सुनेत्रा पवार यांनीच अध्यक्ष व्हावे अशी माझी इच्छा असल्याचे सांगितले. अजित दादांचे उपमुख्यमंत्रीपद त्यांना देण्याच आले आहे. त्याच आता सर्व काम सांभाळत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारीसुद्धा त्यांनाच दिली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाची मला माहिती नाही. मी पक्षाच्या कोअर कमेटीत नाही. त्यामुळे याबाबत काय चर्चा झाल्या याची मला कल्पना नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर पक्षाची ताकद वाढेल असा दावा त्यांनी केला.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची तारीख ठरली होती असे दावे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करीत आहेत. दुसरीकडे अजित दादांच्या नेत्यांना मात्र याची कल्पना नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा याबाबत दादा आपल्याशी कधीच बोलले नाही असे सांगतना असे काही चालू असते तर ते माझ्याशी बोलले असते असे म्हटले आहे.

यावर आत्राम म्हणाले, आता दादा आपल्यात नाहीत. त्यामुळे विलिनीकरणाच्या तारखेच्या चर्चेचा विषय संपला आहे. मात्र पक्षाच्या मजबुतीसाठी एकत्र आले पाहिजे असे माझे मत असल्याचे आत्राम यांनी स्पष्ट केले. घड्याळ चिन्ह लोकांपर्यंत पोहचले आहे. याचा सगळ्यांनाच फायदा होईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे. मात्र पक्षाचे नेतृत्व सर्वांना चालणार असावे. त्यासाठी दादांची (Ajit Pawar) जागा ही सुनेत्रा ताईंना घ्यावी असेही आत्राम म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT