Anil Deshmukh Nagpur Sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh Nagpur : 'कर्जमाफीची हीच योग्य वेळ, निवडणुकीची वाट बघत बसू नका'; देशमुखांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

NCP Sharad Pawar Anil Deshmukh Slams CM Fadnavis in Nagpur Demands Timely Farm Loan Waiver : महायुती सरकारला माजी मंत्री अनिल देशमुख यांनी रासायनिक व डीएपीएसह मिश्र खतांच्या तुटवड्यावरून चांगलेच सुनावलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Mahayuti government : कर्जमाफीसाठी योग्य वेळ पाहत असलेल्या महायुती सरकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रासायनिक व डीएपीएसह मिश्र खतांच्या तुटवड्यावरून चांगलेच सुनावलं आहे.

"शेतकरी अडचणीत आहे. हीच कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे. सरकारने यासाठी निवडणुकीची वाट बघत बसू नये", असा टोला अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे भाष्य केले.

अनिल देशमुख म्हणाले, "पेरण्या सुरू आहे. शेतकरी (Farmer) त्यांच्या पेरण्या उरकत असताना, रासायनिक व डीएपीसह मिश्र खतांचा तुटवडा असल्याची माहिती समोर येत आहे. खतांचा पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा झालेला नाही. डीएपीच्या मागण्याच्या तुलनेत फक्त 30 टक्केच पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे".

'निसर्गाच्या हलरीपणामुळे शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे. शेतकरी अडचणीत असल्याने ही कर्जमाफीसाठी योग्य वेळ आहे. सरकारने यासाठी निवडणुकीची वाट बघू नये', असा टोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला.

रासायनिक खताच्या किमतीही वाढलेल्या आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना या नवीन आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने खताचा पुरवठा करून खताचा तुटवडा दूर करावा. सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमाफी झालेली नसल्याचे सांगून रासायनिक खताच्या किमती कमी कराव्यात अशी मागणीही अनिल देशमुखांनी केली.

सत्तेत सगळेच खूष नाही

शरद पवार यांना सोडणे आमची मजबुरी होती. विपरीत परिस्थिती असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे असे अनेक नेते खासगीत सांगतात. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला. भास्कर जाधव आमचेच आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. ते शरद पवार यांच्याबरोबर असताना, ते येतील की नाही हे मला माहीत नाही. अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार शरद पवारांना सोडून निघून गेले. ते सध्या महायुतीच्या सत्तेत आहे. मात्र, यापैकी सर्वच खूष असल्याचे दिसत नाहीत, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT