
Chiplun News : सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील नेते गुहागरचे आमदार भास्कर जाधव त्यांच्या नाराजीमुळे चर्चेत आहेत. धक्कादायक म्हणजे त्यांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिल्याने राज्यात आणखीन खळबळ उडाली आहे. पण निवृत्तीचे संकेत देत असतानाच त्यांनी आपल्याला विरोधीपक्ष नेते पद का दिले नाही यावरूनही भाष्य केलं आहे. ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
भास्कर जाधव यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. तर आम्हाला विरोधी बाकावर बसावं लागले. त्यावेळी विरोधीपक्ष नेते पद मला देण्याची मागणी शिवसेनं केली होती. त्यासाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा पाठिंबा होता. पण सत्ताधारी पक्ष मला घाबरत असल्याने हे शक्य होऊ शकले नाही. सत्ताधारी पक्ष मला घाबरत आहेत. याचा आपल्याला आनंद असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
यावेळी ते म्हणाले, दिलेलं काम प्रामाणिकपणे कराने हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. जो मी नेहमी करतोच. राजकारणात सर्वस्व झोकून देऊन काम केले, तशाच पद्धतीने समाजकारणात केले. राजकारण, समाजकारण, उत्सव, शेतीत मी रमतो, पण आता वरचेवर राजकारणातून निवृत्ती घ्यावी असे मनात येत आहे. आता सत्तरीही जवळ आलीय.
आतापर्यंत बेधडक आणि बिनधास्त राजकारण केले. त्यामुळे राजकारणात मन रमत होते. आता वयाची सत्तरी जवळ आली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपद पदरात पडेल अशी अपेक्षा होती. विरोधीपक्ष नेता कसा असावा, हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचे होते. स्वतःचा स्वार्थ काही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेत तरतूद आहे.
विरोधीपक्ष नेता असा असला पाहिजे. समोर सत्ताधारी कितीही बलाढ्य असला तरी त्याच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याची ताकद असलेला विरोधीपक्ष नेता असला पाहिजे. तरच सरकार चांगले चालते आणि राज्य चांगले चालते. त्या पद्धतीने वैधानिक काम कसे करायचे हे सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यायचे होते. परंतु, सत्ताधारी पक्ष मला घाबरत आहे. ते मला घाबरत असल्याचा मला आनंद होत आहे. त्यामुळे नैराश्य येत नाही असेही भास्कर जाधव यांनी सांगितले.
सत्ताधारी पक्ष माळवणकरांचा संदर्भ देऊन दहा टक्के आमदारांचा नियम पुढे करतात. पण मी कायदा कोळून प्यायलो आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता हे घटनेत लिहिलेले आहे. सत्ताधारी पक्षाला घटना मान्य नाही, असा आरोप जाधव यांनी केला.
दरम्यान त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते. पण त्यानंतर दोन्ही वेळी काय झालं माहित नाही. पण आपल्या नावाचा मंत्री म्हणून विचार केला गेला नाही. त्यामुळे मला वाईट वाटले होते. पण शिवसेना पक्षात पक्ष नेतृत्त्वाचा निर्णय हा अंतिम असतो. तो आपण स्वीकारला आणि पुढे गेलो. त्यामुळे निराश नसल्याचेही जाधव म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.