Yavatmal NCP Party Workers with MLA Rohit Pawar at Amravati. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal : रोहित पवारांच्या आकस्मिक दौऱ्याचा ठरला ‘प्लान सक्सेसफुल’

NCP : अमरावतीच्या यात्रेत दिसली यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाईची ताकद

सतीश हरिश्चंद्र येटरे

MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सध्या महाराष्ट्रातील 800 किलोमीटरचे अंतर कापत आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून या यात्रेचा गाजावाजा करण्यात आलेला नाही, परंतु अलीकडेच काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी दिलेल्या आकस्मिक यवतमाळ भेटीचा परिणाम अमरावती येथे सोमवारी (ता. 4) काढण्यात आलेल्या यात्रेत दिसला.

यवतमाळ जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते आमदार रोहित पवार यांना ताकद देण्यासाठी अमरावतीत पूर्णवेळ तळ ठोकून होते. (NCP Sharad Pawar Group Party Workers From Yavatmal Joined Yuva Sangharsha Yatra Of MLA Rohit Pawar At Amravati)

आमदार पवार यांनी काही दिवसांपूर्वी अचानक यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. काही गावांमध्ये जात त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेतल्या. त्यांचं कुटुंबही या वेळी सोबत होतं. युवा संघर्ष यात्रा यवतमाळ जिल्ह्यातून काढण्यात आली नाही, परंतु रोहित पवार यांच्या यवतमाळ भेटीनं शरद पवार गटासह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना बळ मिळालं. त्याचाच परीणाम म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते सोमवारी अमरावती येथील यात्रेत सहभागी झालेत.

सध्या रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते म्हणुन नावारूपास येत आहेत. त्यांना पक्षानं ‘युथ आयकॉन’ म्हणून पुढं केलंय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीनं संघर्ष यात्रेत सहभाग घेतला. अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर तरुणाई वास्तव्यास आहे. अमरावतीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं मुख्यालय आहे. अनेक नामांकित शिक्षण संस्था शहरात आहेत. आयआयएमसीही येथे आहे. त्यामुळं पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यांतील विद्यार्थी येथे शिक्षणाच्या निमित्तानं राहतात. पवारांची यात्रा विशेषत: तरुणाईला डोळ्यापुढं ठेऊनच काढण्यात आलीय. त्यामुळं त्यांचं अमरावतीमधील शक्तिप्रदर्शन महत्त्वपूर्ण मानलं जात होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यवतमाळ जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर यात्रेत सहभाग नोंदविला. युवा संघर्ष यात्रेचे सन्मवयक सिद्धेश्वर चव्हाण, शहराध्यक्ष हेमंत देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष गणेश रॉय, युवक शहरा विनेश आडतिया, प्रदेश सचिव रोशन कडू, युवक कार्याध्यक्ष शुभम शेगोकार, फिरोज पठाण, धनंजय तोटे, प्रवीण अडाळसे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल गोहाड, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवराज वाकडे यांनी तरुणाईसह यात्रेचं संख्याबळ वाढवलं. त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यातील तरुणाईमध्ये सध्या रोहित पवार नावाची ‘क्रेझ’ कायम असल्याचं बोललं जात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT