Washim : शरद पवार गटच नव्हे, महाविकास आघाडीत संचारला जोश

Rohit Pawar : शिवसेना, काँग्रेसनेही घेतला युवा संघर्ष यात्रेत उत्स्फूर्त सहभाग
MLA Rohit Pawar in Yuva Sangharsha Yatra.
MLA Rohit Pawar in Yuva Sangharsha Yatra.Sarkarnama
Published on
Updated on

Vidarbha News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा वाशिम जिल्ह्यातून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार यांना कुटुंबासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी साथ दिली. पवारांच्या या यात्रेमुळं शरद पवार गटच नव्हे तर महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांमध्ये जोश संचारला आहे.

यात्रेत रोहित पवार यांच्या सोबत त्यांच्या पत्नी व आईही होत्या. कारंजा येथे पत्नीसोबत पवार यांनी फुगडीचा आनंदही लुटला. यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटानंही आपला जनसंपर्क वाढवला. ( Congress & shiv Sena Uddhav Thackeray Group Also Took Benefit Of NCP Sharad Pawar Group MLA Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra At Washim)

MLA Rohit Pawar in Yuva Sangharsha Yatra.
Washim : पुरोगामी विचारांसोबत राहिले असते, तर दादा लोकांचे मुख्यमंत्री झाले असते

आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचे आयोजन केलं. कंत्राटी भरती, पेपरफूट आदीसंह विविध प्रश्नांवर ही यात्रा काढण्यात आली. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. 45 दिवसांचा प्रवास करून 7 डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होणार आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांतून गेलेल्या या युवा संघर्ष यात्रेतून आमदार पवार यांनी युवा मतदार आकर्षित करण्याचा सर्वाधिक प्रयत्न केला आहे.

युवा संघर्ष यात्रेत रोहित पवार यांना संपूर्ण कुटुंबाची साथ मिळाली आहे. वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती असा संपूर्ण परिवार रोहित पवार यांच्या सोबत युवा संघर्ष यात्रेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार पवार यांचे वडील राजेंद्र पवार हेदेखील यात्रेत सहभागी झाले होते. या वेळी बाप-लेकाचं दृढ नातं या यात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळालं. रोहित पवार यांच्या यात्रेत पाठीमागे पिता राजेंद्र पवार चालत येताना दिसले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे यात्रा दाखल झाल्यानंतर आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती या रोहित पवार यांच्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. युवा संघर्ष यात्रा कारंजा लाडमध्ये पोहोचली असता बेबळा (ता. कारंजा, जि. वाशिम) येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे वारकरीही यात्रेत सहभागी झाले. त्यावेळी रोहित पवार यांनी पत्नी कुंती सोबत टाळ-मृदंगाच्या गजरात फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनीही पवारांसोबत फुगडीचा फेर धरला.

पवार यांच्या यात्रेत काँग्रेससह शिवसेनेचे नेतेही उत्साहाने सहभागी झालेत. सुरुवातीपासून काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी यात्रेत सहभागी होते. युवकांचे प्रश्न जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. माजी मंत्री गुलाबराव गावंडे, संग्राम गावंडे, रवी राठी, जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे हेदेखील यात्रेत उत्साहानं सहभागी झालेत. यात्रेला महाविकास आघाडीतील सदस्यांची खंबीरपणे साथ मिळाल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट करीत. हाच तो ‘हात’ ज्या हाताने घरची जबाबदारी घेतली आणि ज्यामुळे मला आज संघर्षाची जबाबदारी घेता आली. रोहित पवार यांनी पत्नी यात्रेत सहभागी झाल्याचे सांगत हे ट्विट केले होते. हे ट्विट सध्याही चर्चेत आहे.

Edited by : Prasannaa Jakate

MLA Rohit Pawar in Yuva Sangharsha Yatra.
Washim News : ‘युवा संघर्ष’च्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नवचैतन्याची लहर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com