Sharad Pawar, Devendra Fadnavis  sarkarmnama
विदर्भ

NCP SP Vs Mahayuti : ‘कर्जमाफी काय सत्ता संपत आल्यावर...?' शरद पवारांच्या शिलेदाराने फडणवीसांना फटकारलं

Anil Deshmukh On devendra fadnavis loan waiver statement : मे महिन्यात झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा राज्यातला शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्याने उचल खाल्ली आहे.

Aslam Shanedivan

Nagpur News : राज्यातला बळीराजा अवकाळीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे त्रस्त झाला असून कर्जमाफीची मागणी करत आहे. महायुतीचे सरकार आल्यापासून ही मागणी विरोधकांनी देखील लावून धरली आहे. पण सरकार काही मनावर घेताना दिसत नाही. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अनेकदा हात वर केले आहेत. त्यामुळे कर्जमाफी काही मिळणार नाही अशा निकशावर बळीराजा पोहचला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुन्हा एकदा मुद्द्याची वात पेटवली आहे. त्यांनी 'कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारने दिलेला एकही शब्द फिरविणार नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. ज्यानंतर आता टीकेची झोड उठली आहे. याच स्पष्टीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

अनिल देशमुख यांनी, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायतं, की, ‘कर्जमाफी कधी करायची याचे काही नियम आहेत, एक पद्धती आहे. हा निर्णयही सरकार उचित वेळी घेईल. या सरकारने दिलेला एकही शब्द फिरविणार नाही,’ मग काय सत्तेची पाच वर्षे संपत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहात का? असा सवाल केला आहे.

तसेच त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं महायुतीच्या नेत्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र, अवकाळी व त्यानंतर मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जातेय. पण महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द आता फिरवलाय अशी टीका त्यांनी केली आहे.

पावसाची सुरुवात झाली आहे. खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. पण रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असून युरिया, डीएपी आणि मिश्र खतांचा विदर्भात 20 ते 30% तुटवडा आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने पुरवठा वाढवावा आणि काळा बाजार टाळावा. तसेच कर्जमाफीच्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देशमुख यांनी कर्जमाफी कधी करणार? कधी ती वेळ येणार? योग्य वेळ कोणती? आज लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसून हीच योग्य वेळ असून ती काय सरकारच्या पाच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात देणार आहात का? असाही खरमरीत सवाल केला आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सडकून टीका केली आहे. राऊत यांनी, फडणवीस यांची योग्य वेळ नेमकी कधी येणार? विधानसभा निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे वचन दिले होते. तसे जाहीरनाम्यातही दिले होतं. पण आता लाडक्या बहिणींना पैसे दिले नाहीत की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. आता कर्जमाफी काय शेतकऱ्यांच्या दहा हजार की एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर? देणार असा सवाल त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT