Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : अजितदादा विदर्भात मोठा धमाका करणार?

Ajit Pawar on Katol Vidhansabha Election : शनिवारी काटोल विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मोठा राजकीय धमाका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा आमच्या संपर्कात आहे असा दावा राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री बाबा आत्राम यांनी केला होता. यावर देशमुखांनी त्यांचीच मुलगी आमच्या संपर्कात असल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही आजी-माजी मंत्र्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरू असताना शनिवारी काटोल विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मोठा राजकीय धमाका होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या परंपरागत काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे. त्यांनी मध्यंतरी शदर पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. एकाच मतदासंघावर वडील व मुलाने केलेल्या दाव्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर (NCP) मोठा पेच निर्माण झाला आहे. या दरम्यान सलील देशमुख हे अजित पवार (Ajit pawar) यांच्या संपर्कात असल्याचे सांगून बाबा आत्राम यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यास अनिल देशमुख यांनी लगेच उत्तर देऊन त्यांनी तुमची मुलगी आमच्या संपर्कात आहे, याची चिंता आत्राम यांनी करावी असे प्रत्युत्तर दिले होते. विशेष म्हणजे बाबा आत्राम यांची मुलगी यासुद्धा निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उद्या शनिवारी नागपूरला येथे आहे. लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम नागपूर मध्ये आयोजित करण्यात आला आहे. अजित पवार दीक्षाभूमीला भेट देणार असून त्यानंतर काटोलमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. आम्ही जाहीर केल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बहि‍णींच्या खात्यात जमा केला आहे. विरोधक आरोप करत राहिले, आम्ही निधी दिला असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उद्या शनिवारी नागपूरमध्ये येणार आहेत. ते दीक्षाभूमीला भेट देतील आणि नंतर काटोल येथे सभा घेणार आहेत. सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आत्राम नागपूरला आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भात २० जागांची मागणी केली आहे. निवडून येणारे आम्ही उमेदवार देऊ. निवडून आलेला उमेदवार हा महायुतीचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

माझी लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा होती. गडचिरोलीतील (Gadchiroli) लोकांचीसुद्धा हीच भावना होती. आता विधानसभेची निवडणूक लढावी त्यानंतर मुलीला समोर करावे अशी मागणी मतदारांची आहे. मला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. मी निवडणूक लढावी असा मतदारांचा आग्रह असल्याचे बाबा आत्राम यांनी सांगितले. माझी मुलगी कोणाच्या संपर्कात आहे हे अनिल देशमुख यांनाचा विचारा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT