Bjp News : लाडकी बहीण योजनेवरून आता सुनील केदार भाजपचे टार्गेट

Sunil Kedar News : लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा भाजपने सुनील केदार यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळू नये यासाठी केदार मित्रांमार्फत प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केली.
Sunil Kedar
Sunil Kedar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

माजी मंत्री व सावनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना टार्गेट करण्याची एकही संधी भाजपतर्फे सोडली जात नाही. नागपूर जिल्ह्यातील त्यांचे राजकीय वर्चस्व संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. (Bjp News)

लोकसभेच्या निवडणुकीत केदार सर्वांना पुरून उरले. आता लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा भाजपने (Bjp) त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. लाडक्या बहिणीला आर्थिक मदत मिळू नये यासाठी केदार आपल्या मित्रांमार्फत प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका टाकण्यात आली आहे. अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका टाकली आहे. ते केदारांचे जवळचे मित्र आहेत. हा धागा पकडून भाजपने केदारच त्यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना रद्द करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वडपल्लीवार काँग्रेसचे कार्यकर्ते नाहीत, प्राथमिक सदस्यसुद्धा नाहीत, असा खुलासा केला आहे.

Sunil Kedar
Barshi Bazar Samiti : राजेंद्र राऊतांचा सेना-राष्ट्रवादीला छोबीपछाड; भावाच्या हाती सत्ता देत बार्शी बाजार समिती एकहाती राखली

भाजपला मात्र प्रदेशाध्यक्षांचा खुलासा मान्य नाही. कोणाला सदस्य करणे आणि तत्काळ काढूण टाकणे हे काँग्रेसमध्ये सुरूच असते. वडपल्लीवार हे काँग्रेस सदस्य नसेल तर ते काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात कसे दिसतात. केदारांसोबत कसे फिरतात. त्यांचे आणि केदारांचे एकत्रित काही छायाचित्रसुद्धा कोहळे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

महिलांना स्वाभिमानाने, अभिमानाने जगता यावे यासाठी ही योजना आणली आहे. राज्यातील लाखो गोरगरीब महिला याचा लाभ घेत आहे. संसाराला हातभार लावत आहेत. केदारांच्या मतदारसंघातील सुमारे ७५ हजार महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. हे केदार यांना खटकत आहे का ? असा सवाल कोहळे यांनी केला.

लाडक्या बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. यामुळे ही योजना बंद करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्यावतीने सातत्याने केला जात असल्याचे कोहळे यांनी सांगितले. यावेळी केदारांचे एकेकाळचे जवळचे सहकारी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भाजपचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार मनोहर कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Sunil Kedar
Hemant Soren : हेमंत सोरेन यांनी हुकमी एक्का काढला बाहेर! चंपई सोरेन यांच्या भाजप प्रवेशआधीच मोठी खेळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com