Mumbai : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. हा खटला मुंबई येथे स्थलांतरित करण्यासाठी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
एनआयएच्या या अर्जावर नागपूर खंडपीठाने सुनावणी केली आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी जयेश पुजारी आणि राज्य सरकारला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तीस ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याची सूचना न्यायालयाने दिली.
जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोन्ही दहशतवाद्यांना आपल्या ताब्यात द्यावे, यासाठी एनआयएने मागणी केली आहे. अफसर पाशाला 15 जुलै रोजी बेळगाव येथील तुरुंगातून अटक केली होती अटक केल्यानंतरत्याला एकूण दहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशी दरम्यान त्याचे नागपूर कनेक्शन आणि दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध उघड झाले होते.
न्यायिक रेकॉर्ड मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात स्थानांतरित करण्याची मागणी एनआयएने नागपूरमधील विशेष सत्र न्यायालयाकडे केली होती. त्यावर विशेष सत्र न्यायालयाने न्यायिक रेकॉर्ड मुंबईला स्थानांतरित करण्याची मागणी नामंजूर केल्यानंतर एनआयएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे प्रकरण नागपूर येथील न्यायालयात सुरु आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.