Ravikant Tupkar ON bjp Offer : भाजपच्या ऑफरवर रविकांत तुपकराचं उत्तर ; 'भाजप नेत्याचा मला फोन आला..'

Swabhimani Shetkari Sanghatana News : तुपकर यांच्या माध्यमातून एक चांगला सहकारी, कार्यकर्ता आणि एक चांगला नेता आम्हाला भेटेन.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी व पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. या वादावरून अनेक राजकीय पक्षांकडून रविकांत तुपकरांना आपल्या पक्षात येण्यासाठी ऑफर दिल्या जात आहेत.

"रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं," अशी ऑफर भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिली आहे. या ऑफरवर तुपकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. "कुठल्याही भाजप नेत्याचा मला फोन आला किंवा ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेल," असे तुपकरांनी सांगितले.

"विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे आक्रमक नेते म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी कमालीची कामं करणारा भाजप पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा," असं देशमुखांनी काल (शुक्रवारी) म्हटलं. भंडाऱ्यात आशिष देशमुख माध्यमांशी बोलत होते.

रविकांत तुपकर म्हणाले, "आशिष देशमुख यांनी मला भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली हे मला माध्यमातूनच कळलं. मला कुठल्याही भाजप नेत्याने किंवा कार्यकर्त्याने विचारणा केलेली नाही. त्यामुळे आशिष देशमुख यांनी जरी ऑफर दिली असेल तरी ती माध्यमातूनच दिली आहे,"

Ravikant Tupkar
Rahul Gandhi conviction stayed : राहुल गांधींना दिल्लीत मिळालेल्या दिलाशाचा कॉंग्रेसकडून पिंपरीत विजयोत्सव

काय म्हणाले होते आशिष देशमुख..

'सामान्य शेतकरी, कार्यकर्ता आणि नेत्यांचा स्वाभिमान जपला जात नाहीये. शेतकऱ्याचं हित लक्षात घेता रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील पक्षात प्रवेश करावा. तुपकर यांच्या माध्यमातून एक चांगला सहकारी, कार्यकर्ता आणि एक चांगला नेता आम्हाला भेटेन. त्यामुळे त्यांना मी भाजपकडून थेट ऑफर देत आहे.

Ravikant Tupkar
Bachchu Kadu To Aditya Thackeray: जुगार अड्डयावर बसला आहात का ?; बच्चू कडूंनी आदित्य ठाकरेंना झापले..

रविकांत तुपकर काय म्हणाले होते..

नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही. संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com