Nitin Gadkari. Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari : मोदी गडकरींना सुखद धक्का देणार का?

Lok sabha Candidate Nitin Gadkari : अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात ते खासदार नसतानाही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनांच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Rajesh Charpe

Nitin Gadkari Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिसऱ्यांना मंत्रिपदाची शपथ घेतली असून आता त्यांना कोणचे खाते सोपवले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ते वाहतूक खात्यातील त्यांची जबरदस्त कामगिरी बघता सोबतच त्यांना आणखी एखादे खाते देऊन पदोन्नती दिली जाईल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले तेव्हापासून रस्ते आणि गडकरी असे समीकरणच झाले आहे. राज्यात ते चार वर्षे मंत्री होते. अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात ते खासदार नसतानाही प्रधानमंत्री ग्राम सडक योजनांच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

खासदार होऊन केंद्रात मंत्री होताच रस्ते व वाहतूक खाते हे त्यांना सोपवण्यात आले होते. दहा वर्षांपासून हे खाते त्यांच्याकडे आहे. देशात मोदी यांच्यानंतर सर्वाधिक बोलबाला गडकरी आणि त्यांनी निर्माण केलेल्या रस्त्यांचा आहे. गोपिनाथ मुंडे यांच्या अकली निधनानंतर काही काळ त्यांचे ग्राम विकास तसेच जलसंपदा खाते होते. त्यानंतर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचीसुद्धा जबाबदारी होती. त्यापूर्वी असे काही खाते आहे याची कल्पना कोणाला नव्हती.

मंत्र्यांचे सुद्धा नाव कोणाला माहित नव्हते. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हे खाते महत्त्वाचे आहे. नारायण राणे यांना मंत्रीपद दिल्यानंतर हे खाते त्यांना सोपवण्यात आले होते. देशात अनेक उड्डाणपुलांची निर्मिती सुरू आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी गडकरी यांना घोषणा केलेल्या रस्त्यांचे बांधकाम झपाट्याने सुरू आहेत.

हे खाते वगळल्यास शहरच नव्हे देशातील सर्व प्रकल्पांची गती मंदावेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. हे बघता गडकरी यांचे रस्ते वाहतूक खाते कायम ठेवावे अशी मागणी शहरातून होत आहे. प्रमोशनच द्यायचे असेल तर सोबतीला जलसंपदासारखे महत्त्वाचे खाते सोपवण्यात यावे अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष मुदतीत गडकरी हेच भरून काढू शकतात. सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे आहे. फक्त 18 टक्केच सिंचन आतापर्यंत राज्यात निर्माण होऊ शकले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT