Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरींना लॅंडलाईनवर धमकी देणाऱ्या जयेश पुजाराला नागपुरात आणले !

Extortion : १०० कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजाराने मागितली होती.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: जयेश पुजाराने नामक गॅंगस्टरने १४ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात नितीन गडकरींच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन केला होता. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी युद्धपातळीवर सूत्रे हलवीत तपास सुरू केला. आज जयेश पुजाराला नागपुरात आणण्यात आले. (Union Minister Nitin Gadkari's office was threatened)

जानेवारीमध्ये केलेल्या फोनवर १०० कोटी रुपयांची खंडणी जयेश पुजाराने मागितली होती. नंतर केलेल्या फोन मध्ये १० कोटी रुपये गुगल पे करायचे सांगण्यात आले होते. या प्रकरणात कर्नाटकातल्या बेळगावमधील हिंडलगा सेंट्रल जेलमध्ये असलेल्या जयेश पुजाराने फोन केल्याचे तपासात पुढे आले होते. सेंट्रल जेलमधून हे फोन केल्याचेही पुढे आले होते. खुनाच्या एका प्रकरणात आरोपी जयेश पुजाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांच्या दोन सदस्यीय पथकातर्फे बेळगावमधील हिंडलगा कारागृहातील कैद्यांची चौकशी करण्यात आली. मोबाईलचा तपास घेत कैद्यांकडून नागपूर पोलिसांनी विविध स्वरूपाची माहिती घेतलेली आहे.

हिंडलगा कारागृहामधील जयेश या नावाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला होता. कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्याची चौकशी नागपूरच्या पथकाकडून करण्यात आली. नागपूर येथील पोलिसांचे (Police) हे दोन सदस्यांचे पथक मागच्या आठवड्यात गुरुवारी रात्री उशिरा बेळगावमध्ये दाखल झाले होते. शुक्रवारी त्यांनी कारागृहामधील कैद्यांकडे चौकशी केली होती.

यापूर्वी नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी बंगळूर येथील एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले होते. ही तरुणी बंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्याने एक नंबर देत या नंबरवर दहा कोटी रुपयांची खंडणी पाठवण्यास सांगितले होते. हा नंबरचा तपास केला असता हा नंबर बंगळूर एका तरुणीचा असल्याचे आढळून आले. तसेच, तिचा एक मित्र कारागृहात असल्याची माहिती तपासात समोर आली होती.

जयेश पुजाराने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना या पूर्वीही नागपूरच्या (Nagpur) कार्यालयात फोन करून धमकी दिली होती. खरतर तो हत्येच्या प्रकरणात बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत आहे. शिवाय त्यानं जेलमधूनच अशा पद्धतीनं अनेकवेळा या अगोदरही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT