Nitin Gadkari News: हे काम फार दिवस करायचं नाही, मी नाहीतर दुसरा कुणीतरी येईल..: नितीन गडकरींचे पुन्हा निवृत्तीचे संकेत?

Nagpur Politics: राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Nitin Gadkari in Nagpur: मी आता लोकांनाही सांगतो तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही लोणी लावायला तयार नाही. माझ्याजागी दुसरा कोणीतरी नवीन येईल,” अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक मत्री नितीन गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते नागपूरमध्ये रविवारी ( २६ मार्च ) वनराई फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Nitin Gadkari
Nana Patole News : नानांनी दिले टिळकांचे उदाहरण; म्हणाले, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी...

आता मलाही या कामात जास्त वेळ द्यायचा नाही, या कामातून भविष्य बदलू शकतेत. जलसंवर्धनापासून, वातावरणातील बदलापर्यंत आणि पडीक जमिनींचा योग्य वापर, यात प्रयोगाला भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करतोय. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो आणि भविष्यातही यातच जोमाने काम करणार. कारण, या प्रयोगामुळे भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागात मोठा बदल होऊ शकतो, असेही नितीन गडकरींनी म्हटलं.

याच वेळी त्यांनी राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं आहे. राजनीति म्हणजे लोकनिति, धर्मनीती… पण राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीति म्हणजे लोकनीति, धर्मनीति आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणं अपेक्षित आहे,” असंही नितीन गडकरांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com