Nitin Gadkari Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari News : कर्नाटकलाही हवाय गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी !

सरकारनामा ब्यूरो

Threat to Union Minister Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देत, खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी ऊर्फ कांथा याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा खुलासा झाल्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून त्याची चौकशी होणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. ८) केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकारी नागपुरात दाखल झाले. (Officials of Central Investigation Agency arrived in Nagpur)

अधिकाऱ्यांनी जयेशच्या कागदपत्रांची पाहणी केली असून पथक नागपुरात दाखल झाले आहे. त्याला पोलिस इतरत्र घेऊन जाण्याची माहिती आहे. सध्या तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोनदा फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि १०० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी त्याला बेळगावच्या कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

त्याची दोनदा पोलिस कोठडी वाढवून घेतली. त्यातून त्याचा संबंध पीएफआय, लष्करे ए तोयबा आणि ‘डी’ गॅंगशी असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. इंटेलिजन्स ब्यूरोच्या पथकाने जयेशची ११ तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. आता राष्ट्रीय स्तरावरील तपासणी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत.

खुद्द नागपूर पोलिसांनी त्याची एनआयएमार्फत चौकशी व्हावी, यासाठी प्रस्ताव एनआयए कडे पाठविला होता. त्यामुळे त्याची एनआयए (NIA) मार्फत चौकशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यातून रविवारी दिल्लीहून एक अधिकारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी जयेशच्या चौकशीसंदर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांकडून घेतली. दरम्यान गडकरी (Nitin Gadkari) यांना दुसऱ्यांदा धमकी दिल्याप्रकरणी जयेशवर पोलिसांकडून युएपीए दाखल करण्याची तयारी सुरू आहे.

बेळगावच्या (Belgaon) कारागृहातून कारवाई करीत असलेल्या जयेशवर नागपुरातील (Nagpur) धंतोली पोलिसांनी गुन्हे दाखल करीत, त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर विविध कलमांतर्गत अधिकचे गुन्हेही दाखल केले आहेत. तब्बल दोन महिन्यांनंतर या प्रकरणात (Karnataka) कर्नाटक पोलिसांनीही (Police) गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांकडून जयेशला नेण्याची तयारी कर्नाटक पोलिसांकडूनही करण्यात येत असल्याची माहिती आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT